राधेश्याम मोपलवार यांना पदावरून हटवलं ; 'आयबीएन लोकमत' इम्पॅक्ट

चौकशी पूर्ण होईपर्यंत त्या पदावर मोपलवाल राहणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषणा केली. त्यांच्यावर असलेले सर्व आरोप तुमच्या कार्यकाळातील आहे, असे खडे बोल मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावले.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Aug 3, 2017 01:35 PM IST

राधेश्याम मोपलवार यांना पदावरून हटवलं ; 'आयबीएन लोकमत' इम्पॅक्ट

मुंबई, 3 ऑगस्ट :

समृद्धी हायवे जमीन खरेदी घोटाळ्याप्रकरणी अखेर एमएसआरडीसीचे एमडी राधेश्याम मोपलवार यांनी पदावरून हटवण्यात आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत ही घोषणा केली. पण मोपलवारांना पदावरून हटवताना मुख्यमंत्री विरोधकांवरही पलटवार करायला विसरले नाहीत, मोपलवार यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप हे तुमच्या कार्यकाळातील आहेत, असे खडे बोल मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावले.

दरम्यान, मोपलवार काय सरकारचा जावई आहे का ? मोपलवार यांच्या विषयी पीएमओ ऑफिसकडून देखील माहिती घेण्यात आली. खडसेंना एक न्याय आणि मोपलवार यांना एक न्याय का? असा खडा सवाल अजित पवारांनी सभागृहात उपस्थित केला. विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनीही मोपलवारांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती.

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि मोपलवार यांच्यावरील कारवाईच्या मागणीवरून विरोधकांनी आजही अधिवेशनात गदारोळ घातला. तर सत्ताधारी पक्षाने विधान परिषदेतील बहिष्कार आजही कायम ठेवलाय. त्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज काही काळासाठी तहकूब करावं लागलं.

विधानपरिषदेच्या कामकाजात सत्ताधारी सहभागी नाहीत, हा काळा दिवस आहे, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीका केलीय तर

Loading...

घटनेच्या 171 कलमानुसार राज्यपाल अधिवेशन बोलावतात, सत्ताधारी जर सभागृहात उपस्थित राहत नसतील तर हा घटनेचा अपमान आणि राजपालांच्या आदेशाचा भंग आहे, असं मत काँग्रेसचे विधानपरिषद सदस्य अनंत गाडगीळ यांनी व्यक्त केलंय.

विधानसभेतही विरोधकांनी हाच मेहता आणि मोपलवारांचा मुद्दा लावून धरला. सरकार चर्चेसाठी तयार आहे पण विरोधक मोपलवार आणि मेहतांच्या राजीनाम्यावर अजूनही ठाम आहेत. समृद्धी हायवेच्या जमीन खरेदीतील दलालीसंदर्भात मोपलवार यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालीय. तर प्रकाश मेहता एसआरए घोटाळ्यामुळे अडचणीत आलेत.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 3, 2017 12:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...