• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • राधेश्याम मोपलवारांच्या पाठीमागे सीबीआयचाही ससेमिरा !

राधेश्याम मोपलवारांच्या पाठीमागे सीबीआयचाही ससेमिरा !

समृद्धी हायवे घोटाळ्यामुळे चर्चेत आलेले राधेश्याम मोपलवार यांच्यामागे डिसेंबर 2016पासूनच सीबीआय आणि आयकर विभागाचा ससेमिरा लागल्याचं उघड झालंय. यासंबंधीची कागदपत्रं आयबीएन लोकमतच्या हाती लागलीत.

  • Share this:
संजय सावंत, विशेष प्रतिनिधी मुंबई, 3 ऑगस्ट : समृद्धी हायवे घोटाळ्यामुळे चर्चेत आलेले राधेश्याम मोपलवार यांच्यामागे डिसेंबर 2016पासूनच सीबीआय आणि आयकर विभागाचा ससेमिरा लागल्याचं उघड झालंय. यासंबंधीची कागदपत्रं आयबीएन लोकमतच्या हाती लागलीत. सीबीआय, आयकर विभाग आणि पीएमओनंही वारंवार मोपलवार यांच्याबाबत माहिती मागवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील जानेवारी 2017 मध्ये पोलीस महासंचालकांना पत्र लिहून राधेश्याम मोपलवार यांची क्राईम ब्रांचकडून चौकशी करण्याचे आदेश दिले होते. अशातच आता समृद्धी हायवे जमीन खरेदी घोटाळ्यात मोपलवालांवर सेटलमेंटचे आरोप झाल्यानंतर विरोधकांनी हा मुद्दा अधिवेशनात उचलून धरला तेव्हा कुठे मुख्यमंत्र्यांनी त्यांना एमएसआरडीसीच्या एमडी पदावरून हटवलंय. तसंच विरोधकाच्या काळातच मोपलवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. पण इथं मूळ मुद्दा असा आहे की मग इतके दिवस मोपलवारांना नेमकं कोण वाचवत होतं हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. कारण मोपलवारांची दलालासोबतची ऑडिओ क्लिप व्हायरल होऊनही सरकारने त्यांच्यावर कारवाई करायला चार दिवस घेतलेत. दरम्यान, मोपलवारांवरच्या कारवाईमुळे मुख्यमंत्र्यांचं ड्रिम पोजेक्ट असलेला समृद्धी हायवे प्रकल्प पुन्हा वादात सापडलाय.
First published: