S M L
Football World Cup 2018

मान्सून कमिंग सून, 5 दिवसांत अंदमानात

१५ मेच्या आसपास मॉन्सून दक्षिण अंदमानात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Sachin Salve | Updated On: May 10, 2017 09:24 PM IST

मान्सून कमिंग सून, 5 दिवसांत अंदमानात

10 मे : पावसाची चातकासारखी वाट पाहून असणाऱ्या बळीराजाला लवकरच दिलासा मिळणार आहे. नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) अंदमानात दाखल होण्यास पोषक स्थिती निर्माण होत आहे. १५ मेच्या आसपास मॉन्सून दक्षिण अंदमानात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मान्सून अंदमान निकोबारमध्ये अवघ्या पाच दिवसात दाखल होणार आहे. असं झालं तर अरबी समुद्रावरून येणारी मान्सून शाखाही वेळेवर दाखल होऊ शकते. तर दुसरीकडे मान्सूनच्या स्थितीत सुधारणा होऊन सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आज पुन्हा वर्तवण्यात आलाय.

पहिल्या मान्सून भाकितात हवामान विभागानं सरासरी इतकाच पाऊस पडेल असं म्हटलं होतं. त्यात आता बदल करत मान्सूनची स्थिती आणखी सुधारलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 10, 2017 09:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close