खूशखबर, मान्सून 23 मेपर्यंत अंदमानात !

खूशखबर, मान्सून 23 मेपर्यंत अंदमानात !

  • Share this:

18 मे : पावसाचा चातकासारखी वाट पाहण्याऱ्या बळीराजाला हवामान खात्याने दिलासादायक बातमी दिलीये. यंदा मान्सून 23 मेपर्यंत अंदमानपर्यंत तर 29 मे पर्यंत केरळमध्ये दाखल होणार असल्याची शुभवार्ता भारतीय हवामान खात्यानं वर्तवलाय.

उकाड्यामुळे लाहीलाही होणाऱ्या संपूर्ण देशवासियांना विशेषतः शेतकऱ्यांना या बातमीनं नक्कीच दिलासा मिळालाय. दरम्यान या आधी स्कायमेट या खासगी संस्थेनं देखील मान्सून केरळात 28 मे पर्यंत दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता.

दरम्यान, यावर्षी देशात सरासरीएवढा पाऊस पडेल, असा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेनं वर्तवलाय. जूनमध्ये सरासरीच्या 111 टक्के पाऊस पडेल. जुलै आणि ऑगस्टमध्ये पाऊस थोडा कमी होईल, आणि सप्टेंबरमध्ये पुन्हा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवलाय.

सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांना याचा लाभ होईल. एकूणच खरिपाचा हंगाम चांगला जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 18, 2018 08:12 PM IST

ताज्या बातम्या