News18 Lokmat

कोल्हापूरसह 'या' शहरांत पावसाची हजेरी, कडक उन्हाळ्यात नागरिकांना दिलासा

या अवकाळी पावसामुळे उकाड्याने हैराण कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला आहे. दुपारी 2 पासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होतं आणि आता पावसाने हजेरी लावली.

News18 Lokmat | Updated On: Apr 13, 2019 04:48 PM IST

कोल्हापूरसह 'या' शहरांत पावसाची हजेरी, कडक उन्हाळ्यात नागरिकांना दिलासा

कोल्हापूर, 13 एप्रिल : एकीकडे नागरिक उन्हाच्या झळ्यांनी हैराण झाले असताना कोल्हापुरात मात्र पावसाने हजेर लावली आहे. कोल्हापूरच्या शहर परिसरात वळीव पावसाने हजेरी लावली आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी बरसल्याने परिसरात आल्हाददायक वातावरण आहे.

या अवकाळी पावसामुळे उकाड्याने हैराण कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला आहे. दुपारी 2 पासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होतं आणि आता पावसाने हजेरी लावली. दरम्यान, महाराष्ट्रातल्या मुंबईसारख्या शरहरांमध्ये कडाक्याचा ऊन्हाळा आहे.

शनिवारी वर्धा जिल्ह्याच्या काही भागातही वादळीवारासह रिमझिम पाऊस पडला. वाढत्या तापमानामुळे वातावरणात उकाडा पसरला. पण पावसामुळे थोडाफार दिलासा मिळाला आहे.

तर सोलापूर शहर आणि परिसरात रात्रीच्या सुमारास मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. पावसामुळे काही काळ शहरातील वीजपुरवठा झाला खंडित झाला होता.

मान्सून हूल देणार की वेळेत येणार? पावसाबाबतचा जाणून घ्या अंदाज

Loading...

काही दिवसांपूर्वी स्कायमेटच्या अंदाजानुसार देशात मान्सून सरासरीच्या 93 टक्के पडणार अशी शक्यता वर्तवण्यात आलं. भारतातील मान्सूनवर अल निनो वादळाचा प्रभाव असेल असाही अंदाज स्कायमेटनं वर्तवला. मात्र हवामान विभागाने देशात यंदा चांगला मान्सून होणार असल्याचा अंदाज आहे. मान्सूनवर अल निनो वादळाचा प्रभाव कमी असू शकतो असंही सांगण्यात आलं आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, आताच मान्सूनसंदर्भात काहीही बोलणं योग्य ठरणार नाही. आतापर्यंतच्या अंदाजानुसार अल निनोचा प्रभाव कमी असेल त्यामुळे यंदा मान्सून सरासरीपेक्षा जास्त असेल अशी शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदाच्या मौसमात दिलासा मिळू शकतो.

यंदा सरासरीच्या 95 ते 104 टक्के सामान्यत: मान्सून येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मान्सून चांगला झाला तर त्याचा परिणाम कोणत्या गोष्टींवर होणार?

1.आर्थिक विकास चांगला होईल.

2.शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.

3.अनेक ग्रामीण भागांमध्ये पाण्याचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.

4.चांगला पाऊस झाला तर उत्पादन चांगलं येईल आणि शेतकऱ्यांना, छोट्या व्यापाऱ्यांना फायदा होईल.

5. महामाई कमी होण्याची शक्यता

6. शेअर बाजारावर होऊ शकतो परिणाम

7. पाऊस चांगला झाला तर त्याचा फायदा बँक आणि फायनान्शियल सेक्टरलाही होणार आहे.

8. शेतकऱ्यांना आवश्यक ती उपकरण, वस्तू, खतांची मागणी वाढण्याची शक्यता आहे.

त्यामुळे स्कायमेट आणि आयएमडी या दोन्हीचे अंदाज अगदी वेगवेगळे आहेत. दरम्यान, उन्हाचे आणि पाणी टंचाईचे चटके बसलेला शेतकरी आणि जनता पावसाची आतूरतेनं वाट पाहत आहे.


VIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंवर पलटवार, मनसेला म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 13, 2019 04:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...