अवकाळी पावसात 3 जणांचा मृत्यू, ढगाळ वातावरणामुळे 'या' शहरांत पावसाची शक्यता

अवकाळी पावसात 3 जणांचा मृत्यू, ढगाळ वातावरणामुळे 'या' शहरांत पावसाची शक्यता

मंगळवारीही अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे. मुंबईमधल्या अनेक भागांमध्ये हलक्या पावसाच्या सरी बरसल्या तर महाराष्ट्रात अनेक शहरांमध्ये आज आणि उद्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 16 एप्रिल : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह देशाच्या अनेक राज्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. मंगळवारीही अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे. मुंबईमधल्या अनेक भागांमध्ये हलक्या पावसाच्या सरी बरसल्या तर महाराष्ट्रात अनेक शहरांमध्ये आज आणि उद्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

झाड कोसळल्यामुळे एकाचा मृत्यू

नाशिकच्या मालेगाव वादळी वाऱ्यामुळे झाड अंगावर कोसळल्यानं मोटारसायकलवर जाणाऱ्या व्यापाऱ्याचा मृत्यू झाला आहे. विकास अग्रवाल असं मयत झालेल्या व्यापाऱ्याचं नाव आहे. तर शहरातील मध्यवर्ती असलेल्या चौकात रिक्षावर झाड पडल्याने रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. शहरात ठिकाणी-ठिकाणी विजांचा तारांवर झाड कोसळल्यामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे.

वीज पडून दोन जणांचा मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी

पाथरी तालुक्यातील अंधापुरी गावात वादळी वाऱ्यासह वीजांचा गडगडाट झाला. अचानक सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे मेंढपाळ झाडाच्या खाली थांबले होते. बाळू काळे आणि कृष्णा शिंदे अशी मयत मेंढपाळांची नावं आहेत. तर यात रामभाऊ शिंदे गंभीर जखमी झाले आहेत. तर वीज कोसळल्यामुळे 15 ते 20 शेळ्या आणि मेंढ्याही दगावल्या आहे.

हेही वाचा: सोलापूरच्या सभेत राज ठाकरेंनी 'वंचित बहुजन आघाडी'वर कसं केलं भाष्य?

वर्धा जिल्यात अवकाळी पावसाची हजेरी

मंगळवारी देशात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून वर्ध्यामध्ये वादळासह विजांचा गडगडाट सकाळपासून सुरू आहे. विजांचा कडकडाट आणि जोरदार वादळवाऱ्यासह अवकाळी पावसाने जिल्ह्याच्या काही भागांत हजेरी लावली.

कमी-अधिक प्रमाणात पावसाच्या सरी कोसळल्या असून उर्वरित तालुक्यांत ढग दाटून आले आहेत. आत्ताही ढगाळ वातावरण कायम आहे.

सासवडला अवकाळी पावसानं झोडपलं, गारांचा ही मारा

पुरंदर तालुक्यातील सासवड इथं ढगांच्या गडागडाटासह पावसाला सुरुवात झाली. सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचाही मारा झाला. यामुळे सर्वांचीच गोंधळ उडाली होती. बाजारपेठेतून रस्त्यांवर पाणी वाहत होतं.

तालुक्यात जेजुरी परिसरसह इतर ही पावसाने हजेरी लावली होती. आज सकाळपासूनच प्रचंड उकाडा जाणवत होता. शेवटी पावसाने हजेरी लावून हवेत गारवा निर्माण केला.

मनमाड, मालेगाव, येवला, लासलगाव, नांदगांव, सटाणा यांसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात विजांचा कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे तर ऊन्हाने हैराण झालेल्या नागरिकांना मात्र काहीसा दिलासा मिळाला आहे.

संगमनेर शहरात वादळी वाऱ्यासह पाऊसाने हजेरी लावली. यावेळी गाराही पडल्या. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची पुरती धावपळ उडाली.


VIDEO : ...आणि भाजपच्या जाहिरातीतल्या 'पोस्टर बाॅय'ला राज ठाकरेंनी व्यासपीठावरच बोलावलं!

VIDEO : ...आणि भाजपच्या जाहिरातीतल्या 'पोस्टर बाॅय'ला राज ठाकरेंनी व्यासपीठावरच बोलावलं!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 16, 2019 09:04 AM IST

ताज्या बातम्या