मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

कोरोनाच्या हाहाकारामध्ये आसमानी संकट, तब्बल 9 जणांचा मृत्यू

कोरोनाच्या हाहाकारामध्ये आसमानी संकट, तब्बल 9 जणांचा मृत्यू

या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

  • Published by:  Manoj Khandekar
सारण (बिहार), 26 एप्रिल : संपूर्ण देशात कोरोनाचा फैलाव वाढत असताना आता देशातील नागरिकांवर आसमानी संकट कोसळलं आहे. अंगावर वीज पडून तब्बल 9 लोकांचा मृत्यू झाला तर 15 जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बिहारमधील छपरा इथे हा प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व लोक पडवलचं शेतात पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी पावसाला सुरुवात झाली. घाईमध्ये सर्व लोक एका झोपडीत लपून राहिले, मुसळधार पावसासह विजांचा गडगडाट सुरू झाला आणि मोठी वीज कोसळून 9 जणांचा मृत्यू झाला. रूग्णालयाचे उपअधीक्षक डॉ. राम इकबाल सिंह यांनीही 9 जणांच्या मृत्यूची पुष्टी केली असून ते म्हणाले की, जखमींवर उपचार सुरू आहेत. स्थानिक लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जखमींची संख्याही वाढण्याची शक्यता आहे. स्थानिक लोकांनी सांगितले की बरेच लोक अजूनही घटनास्थळावर अडकले आहेत, ज्यांना रुग्णालयात नेण्याची आणि तात्काळ उपचाराची गरज आहे. सर्व मृतक स्वत: शेरपूर गावचे रहिवासी आहेत. पृथ्वीचं मोठं संकटं टळलं! ओझोनवरील छिद्र अचानक झालं बंद, हे कोरोनामुळे झालं? डीएमची मोठी घोषणा शेरपूर गावात गडगडाटामुळे 9 जणांच्या दुःखद मृत्यूनंतर डीएमने नुकसान भरपाईची घोषणा केली आहे. मृतांच्या कुटुंबियांना 4 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा डीएमने केली आहे. सारणच्या डीएमने या संपूर्ण घटनेला दुःखद म्हणून प्रशासन जखमींवर उपचार करण्यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था करत असल्याचं सांगितलं आहे. घटनेनंतर डीएम यांनी सदर हॉस्पिटलला भेट दिली व व्यवस्थेचा आढावा घेतला. 3 मे रोजी लॉकडाऊन संपणार त्यानंतर काय? उद्धव ठाकरेंच्या संवादातील ठळक मुद्दे मोतीहारीमध्ये वीज कोसळल्यामुळे घर जळालं बिहारच्या इतर जिल्ह्यांतही पाऊस आणि त्यानंतर वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याची माहिती आहे. मोतीहारी जिल्ह्यात गडगडाटामुळे एका घरात आग लागली तर दोन झोपड्या जळून खाक झाल्या. या घटनेत कापड, धान्यासह लाखोंचा माल जळाला. इतर जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस आणि वादळी वादळाचे सावट अद्याप आहे. हवामान खात्याने दुपारी 12 वाजेपर्यंत बिहारमधील अर्धा डझन जिल्ह्यांना हाय अलर्टवर ठेवले आहे. देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात, टॉप 5 मध्ये या राज्यांचा समावेश संपादन - रेणुका धायबर
First published:

पुढील बातम्या