बाप्पाच्या आगमनाआधी 'या' भागांत मुसळधार पावसाला सुरुवात, काही ठिकाणी होणार अतिवृष्टी!

बाप्पाच्या आगमनाआधी 'या' भागांत मुसळधार पावसाला सुरुवात, काही ठिकाणी होणार अतिवृष्टी!

2 सप्टेंबरपासून बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होईल. त्यामुळे वातावरणात पुन्हा बदल होणार असल्याचं पुणे वेधशाळेनं म्हटलं आहे.

 • Share this:

मुंबई, 31 ऑगस्ट : ऑगस्टच्या पहिल्या 10 दिवसांमध्ये महाराष्ट्रासह अनेक राज्यांत अतिवृष्टी झाली होती. पण त्यानंतर पावसाने चांगलीच विश्रांती घेतली होती. काही वेळ दडी मारल्यानंतर आता पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात गुरुवारपासून अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या तर शनिवारी मात्र अनेक भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली.

भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानूसार सप्टेंबरमध्ये महाराष्ट्राच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे. प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा आणि विदर्भात दमदार पाऊस होणार असल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे. दरम्यान, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार किंवा अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

2 सप्टेंबरपासून बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होईल. त्यामुळे वातावरणात पुन्हा बदल होणार असल्याचं पुणे वेधशाळेनं म्हटलं आहे. त्याचा परिणाम म्हणजे अनेक राज्यांत पुन्हा मुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे. शुक्रवारी रात्रीपासून ते शनिवारी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस सुरू आहे.

मुंबईसह उपनगरांमध्ये शुक्रवारी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या तर शनिवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांची थोडी तारांबळ उडालेली पाहायला मिळाली. दरम्यान, मुंबईसह औरंगाबादमध्येही दमदार पाऊस झाला आहे. त्याचबरोबर नागपूर आणि मनमाडमध्येही चांगलाच पाऊस झाला आहे.

शनिवारी औरंगाबादमध्ये मुसळधार पावसाला सुरवात झाली. जिल्ह्यातील सगळ्या तालुक्यात मोठा पाऊस सुरू आहे. जवळपास महिना भरापासून पावसाने दडी मारली होती. पण आता सुरू झालेला पाऊस बराच वेळ पडण्याची शक्यता आहे. तर औरंगाबादमध्ये आकाश काळ्या ढगांनी दाटलं आहे.

इतर बातम्या - मोदींचं नाव घेताच बसला शॉक, पाहा पाकिस्तानच्या 'आयटम' मंत्र्याचा व्हायरल VIDEO

नागपुरातही मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे नागपूरला पाणी पुरवठा करणाऱ्या धारणांमध्ये निश्चितच जल पातळीत वाढ होईल. नागपूरच्या तोतलाडोह धरणात सध्या 33 टक्के पाणी साठा झाला आहे. तर या पावसामुळे नागपूरकरांना दिलासा मिळेल. चांदवड, नांदगाव, सटाणा भागातही दडी मारून बसलेला पाऊस अखेर आज बरसला आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच सुखावला आहे. पावसाच्या हजेरीमुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे.

चांदवडला जोरदार पावसाने अक्षरशः झोडपून काढलं असून नांदगावला चांगला तर सटाणा भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड आणि परिसरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार सुरू असून जगबुडी आणि नारंगी नद्यांच्या पाण्याच्या पातळीत पुन्हा वाढ झाली आहे. अनेक ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहे.

इतर बातम्या - 11 महिन्याच्या चिमुकलीवर उपचार करण्यासाठी आईची भन्नाट आयडिया, आधी बाहुलीला बांधलं प्लास्टर!

पावसाचा जोर असाच कायम राहिला तर ग्रामीण भागातील अनेक अंतर्गत रस्त्यांवर आणि पुलावरून पाणी जाऊन दळणवळण ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गणेशोत्सवाच्या पार्शवभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगच रांगा लागल्या असून पावसामुळे वाहतूकदेखील धिम्यागतीने सुरू आहे.

कोल्हापुरात भररस्त्यावर दोन महिलांचा फ्री स्टाईल हाणामारी, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 31, 2019 05:09 PM IST

ताज्या बातम्या

 • India
 • World

India

 • Active Cases

  6,039

   
 • Total Confirmed

  6,761

   
 • Cured/Discharged

  515

   
 • Total DEATHS

  206

   
Data Source: Ministry of Health and Family Welfare, India
Hospitals & Testing centres

World

 • Active Cases

  1,158,608

   
 • Total Confirmed

  1,622,102

  +18,450
 • Cured/Discharged

  366,302

   
 • Total DEATHS

  97,192

  +1,500
Data Source: Johns Hopkins University, U.S. (www.jhu.edu)
Hospitals & Testing centres