मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत, मुलुंड स्थानकात ओव्हरहेड वायरवर झाड कोसळलं

मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत, मुलुंड स्थानकात ओव्हरहेड वायरवर झाड कोसळलं

मुलुंड स्थानकाजवळ झाड पडल्यामुळे डाऊन दिशेला जाणाऱ्या लोकल उशिराने धावत असल्याची उत्तघोषणा डोंबिवली स्थानकात देण्यात येत आहे.

  • Share this:

मुंबई, 06 जुलै : शनिवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून मध्य रेल्वे  विस्कळीत झाल्याची माहिती देण्यात आली आहे. शनिवारचा दिवसही मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी तापदायक ठरणार आहे. मुलुंड स्थानकामध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर ओव्हरहेड वायरवर झाड पडलं आहे. यामुळे मध्य रेल्वेची डाऊन दिशेची म्हणजेच सीएसएमटीवरून कल्याणकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मुलुंड स्थानकाजवळ झाड पडल्यामुळे डाऊन दिशेला जाणाऱ्या लोकल उशिराने धावत असल्याची उत्तघोषणा डोंबिवली स्थानकात देण्यात येत आहे. त्यामुळे कामाला जाणाऱ्या प्रवशांचे मोठे हाल होणार हे नक्की. आधीच पावसाचा जोर वाढल्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना चाकरमान्यांना करावा लागत आहे. त्यात आता रेल्वे विस्कळीत झाल्यामुळे प्रवशांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

मुंबईमध्ये थोड्याशा विश्रांतीनंतर पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. आज पहाटेपासूनच मुंबई आणि उपनगरांतही मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. काल पावसानं थोडी उसंत घेतली होती. पण, सकाळपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी मुसळधार पाऊस होणार असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

ठाणे, डेंबिवलीतही पावसानं हजेरी लावली आहे. दिवा, कल्याण आणि ग्रामीण भागात रात्रीपासूनच पाऊस पडत असूनच मध्येच जोरदार पाऊस तर मध्येच हलक्या सरी पडत आहेत. त्यामुळे आज दिवसभरात मुंबई शहर आणि उपनगरात अधून मधून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या पश्चिम उपनगरात पाऊस जोरदार कोसळतो आहे.

हेही वाचा : कल्याणमध्ये दिवसाढवळ्या महिलेची हत्या, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गेले 3 दिवस जोरदार पाऊस झाला. पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे 7 जुलैपर्यंत देशातल्या अनेक राज्यांत मुसळधार पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

पुढच्या 24 तासांत मध्य प्रदेश आणि विदर्भामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो. हवामानाची स्थिती मान्सूनसाठी अनुकूल आहे आणि त्यामुळे मान्सून वेगाने पुढे जाऊ शकतो. राजधानी दिल्लीमध्ये मात्र अजूनही उष्णतेच्या झळा कायम आहेत. इथे सगळेजण पावसाची वाट पाहत आहेत.

मुंबईमध्ये पावसाचा अलर्ट

मुंबईमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. 2005 नंतर मुंबईत 24 तासात एवढा मुसळधार सोमवार आणि मंगळवारी झाला. आजही काही भागात पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.

उत्तराखंड, छत्तीसगड, दक्षिण गुजरात, कर्नाटकची किनारपट्टी, केरळ, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, तेलंगणा या राज्यांत जोरदार पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

6 जुलै : भारताच्या अनेक राज्यांत चांगला पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

7 जुलै : कोकण, गोवा, कर्नाटकची किनारपट्टी या भागांसोबतच ईशान्य भारत, मध्य प्रदेश, ओडिशा या राज्यांतही चांगला पाऊस होऊ शकतो.

दरम्यान, अर्थसंकल्पानं निराश केल्यानंतर आणि मध्य रेल्वेच्या खोळंब्यामुळे वैतागलेल्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. 15 ऑगस्टला मध्य रेल्वे एक मोबाईल अॅप लाँच करणार आहे. या मोबाईल अॅपमुळे रोजची ट्रेन कुठे आली, उशिरा धावतेय का? ट्रेन रद्द झाली का अशी सगळी माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. जीपीएस प्रणालीवर आधारित असं हे मोबाईल अॅप असेल. त्यामुळे अॅपवरील अपडेटनुसार तुम्ही घरबसल्या तुम्हाचा प्रवास प्लान करू शकाल.

VIDEO: भररस्त्यात तरुणीवर धारदार शस्त्रानं सपासप वार

First published: July 6, 2019, 8:12 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading