महाराष्ट्रातील 'या' भागात मुसळधार पाऊस, 17 बंधारे गेले पाण्याखाली

महाराष्ट्रातील 'या' भागात मुसळधार पाऊस, 17 बंधारे गेले पाण्याखाली

पंचगंगा नदीची पाणीपातळी 24 फुटांवर आली आहे. राधानगरी धरणात 3.26 TMC पाणीसाठा झाला आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 06 जुलै : कोल्हापूरच्या धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. सतत सुरू असलेल्या तुफान पावसामुळे जिल्ह्यातील 17 बंधारे पाण्याखाली गेले असल्याची माहिती देण्यात आली आहे. गगनबावडा, चंदगड तालुक्यात जोरदार पाऊस आहे. राजारामसह शिंगणापूर, हळदी बंधारे पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे लोकांचं मोठं आर्थिक नुकसान झालं असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. मुंबईतही पश्चिम उपनगरात पावसाची रिपरिप सुरू आहे.

पंचगंगा नदीची पाणीपातळी 24 फुटांवर आली आहे. राधानगरी धरणात 3.26 TMC पाणीसाठा झाला आहे. तर मुसळधार पावसामुळे तिलारी घाटात रस्ता खचल्याने वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. कोयना धरणात 19.30 TMC पाणीसाठा झाला आहे. तर पंचगंगा, कृष्णा नदीच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाली आहे.

महाराष्ट्रात अनेक भागांत पावसामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. तर काही ठिकाणी चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. खेडमधील जगबुडी आणि नारंगी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास अनेक ठिकाणी अंतर्गत मार्ग बंद होण्याची शक्यता असल्याची माहिती देण्यात आली आहे.

जालन्यामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. पावसाची तुरळक रिमझिम सुरू आहे. परिसरात मुसळधार पाऊस होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. चिपळूणमध्ये परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र पाऊस आहे. दापोली-मंडणगड तालुक्याला रात्री पासूनच पावसाने झोडपलं आहे. बांधतीवरे नदीने धोक्याची पातळी ओलांडली. दापोलीतील नारगोळी, सोंडेघर, शिरसाडी,  बोरथळ, धरण ओव्हरफ्लो झाले आहेत. मंडणगड - बाणकोट खाडीनेदेखील धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडण्य़ाचे आदेश देण्यात आले आहे. धरण परिसरात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

हेही वाचा : स्नान करताना महिलेचा व्हिडीओ तयार करणारा पोलीस गजाआड

मुंबईमध्ये पावसाचा अलर्ट

मुंबईमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. 2005 नंतर मुंबईत 24 तासात एवढा मुसळधार सोमवार आणि मंगळवारी झाला. आजही काही भागात पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.

उत्तराखंड, छत्तीसगड, दक्षिण गुजरात, कर्नाटकची किनारपट्टी, केरळ, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, तेलंगणा या राज्यांत जोरदार पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

6 जुलै : भारताच्या अनेक राज्यांत चांगला पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

7 जुलै : कोकण, गोवा, कर्नाटकची किनारपट्टी या भागांसोबतच ईशान्य भारत, मध्य प्रदेश, ओडिशा या राज्यांतही चांगला पाऊस होऊ शकतो.

दरम्यान, अर्थसंकल्पानं निराश केल्यानंतर आणि मध्य रेल्वेच्या खोळंब्यामुळे वैतागलेल्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. 15 ऑगस्टला मध्य रेल्वे एक मोबाईल अॅप लाँच करणार आहे. या मोबाईल अॅपमुळे रोजची ट्रेन कुठे आली, उशिरा धावतेय का? ट्रेन रद्द झाली का अशी सगळी माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. जीपीएस प्रणालीवर आधारित असं हे मोबाईल अॅप असेल. त्यामुळे अॅपवरील अपडेटनुसार तुम्ही घरबसल्या तुम्हाचा प्रवास प्लान करू शकाल.

VIDEO: धोनीला पाहायचंय? या ठाण्याच्या मॉलमध्ये!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 6, 2019 01:49 PM IST

ताज्या बातम्या