मान्सून पहिल्यांदाच इतका उशिराने, अखेर शनिवारपर्यंत होणार गोव्यात दाखल

मान्सून पहिल्यांदाच इतका उशिराने, अखेर शनिवारपर्यंत होणार गोव्यात दाखल

भारतीय हवामान विभागाने नुकत्याच दिलेल्या अंदाजानुसार, 22 जूनपर्यंत मान्सून गोव्यात दाखल होणार आहे. आतापर्यंतचा हा सगळ्यात उशिराचा मान्सून असल्याचंही हवामान विभागानं म्हटलं आहे.

  • Share this:

मुंबई, 19 जून : सध्या सगळा देश पावसाच्या प्रतिक्षेत आहे. यंदाचा पाऊस नेहमीपेक्षा 15 दिवसांनी उशिरा आहे. त्यामुळे संपूर्ण देशाच भीषण पाणी टंचाईचा सामना पाहायला मिळत आहे. अशात भारतीय हवामान विभागाने नुकत्याच दिलेल्या अंदाजानुसार, 22 जूनपर्यंत मान्सून गोव्यात दाखल होणार आहे. आतापर्यंतचा हा सगळ्यात उशिराचा मान्सून असल्याचंही हवामान विभागानं म्हटलं आहे.

12 ते 15 जूनपर्यंत मान्सून गोव्यात दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता. पण अद्यापही मान्सूनने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची काळजी वाढली आहे. पुढच्या 1 ते 2 दिवासांमध्ये मान्सून कोकणात दाखल होईल असाही अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता.

सध्या सगळ्या महाराष्ट्राला वेध लागले ते मान्सूनचे. उन्हाने होरपळणाऱ्या राज्याला पाऊस एकदाचा केव्हा येतो आणि केव्हा नाही असं झालं आहे. तर शेतकरी पावसाची उत्कंठेने वाट पाहातोय. वायू चक्रीवादळाने मान्सूनचं आगमन लांबलं असल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे.

लांबलेला हा मान्सून 22 जूनपर्यंत गोव्यात दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तर त्यानंतर 25 जूनपर्यंत सर्व महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होईल असा अंदाज पुणे वेधशाळेचे हवामान संचालक डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिला आहे.

वायू चक्रीवादळामुळे देशाच्या अनेक भागांत मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. भारतीय हवमान विभागाने याआधी दिलेल्या माहितीनुसार, 20 जूननंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता होती. 20 तारखेपर्यंत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती.

गेल्या आठवड्यापासून मुंबईसह काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. पण तरी पावसाचा जोर कमी आहे. मध्य भारतातही पावसाचा जोर कमी प्रमाणात आहे. पण 25 जूननंतर मात्र, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये मूसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा : अजित पवारांच्या तुफान फटकेबाजीला एकनाथ खडसेंनी दिली दाद

मान्सून केरळमध्ये...

आठवड्याभरापूर्वी मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. त्याची राज्याला आता प्रतिक्षा लागून राहिली आहे. 13 ते 14 जूनला मान्सून राज्यात दाखल होईल असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. पण, वायू चक्रीवादळामुळे मात्र मान्सूनच्या प्रगतीवर परिणाम झाला असून मुंबईकरांना आणखी आठवडाभर वाट पाहवी लागणार आहे. राज्यात सध्या भीषण दुष्काळ आहे. शिवाय, उकाड्यानं देखील नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे सर्वांच्या नजरा या पावसाकडे लागून राहिल्या आहेत.

पावसानं ओढ दिल्यानं शेतकऱ्यांसमोर नवं आव्हान उभं राहिलं आहे. शेती पेरणीसाठी सज्ज झाली. मात्र, काळ्या आईला प्रतिक्षा लागली आहे ती आभाळीच्या देवाच्या भेटीची...राज्यातील शेतकरी आणि शेती पुन्हा एकदा अस्मानी संकटात सापडली आहे. यंदाही मृग नक्षत्राचा मुहूर्त टळल्यानं शेतकरी अजूनही पेरणीच्या प्रतिक्षेत आहे.

गेल्या वर्षी केवळ 73 टक्के पाऊस झाला होता. आणि त्यामुळे खरिपाची 85 लाख हेक्टर शेती बाधित झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना खरिपासोबतच रब्बीचाही फटका सहन करावा लागला. पावसाची ओढ, नापिकी आणि कर्जबारीपणाचा फेरा हे चक्र जणू शेतकऱ्याच्या पाचवीला पुजलं आहे असंच म्हणावं लागेल.

VIDEO : फडणवीसांना फडण20 असं म्हणायचं का? अजितदादांची तुफान फटकेबाजी

First published: June 19, 2019, 6:29 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading