राज्यात मुसळधार पावसामुळे हाहाकार, झाड पडून एकाच घरातील 3 जणांचा मृत्यू

राज्यात मुसळधार पावसामुळे हाहाकार, झाड पडून एकाच घरातील 3 जणांचा मृत्यू

खामगाव तालुक्यातील घाटपुरी येथील आनंद नगर येथे घरावर निबांचे झाड पडल्याने एकाच घरातील तिघांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात पावसामुळे मृत्यू होण्याची ही पाचवी घटना आहे.

  • Share this:

बुलडाणा, 22 जून : बुलडाणा जिल्ह्यात सवत्र वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे झाड कोसळून एकाच घरातील 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. खामगाव तालुक्यातील घाटपुरी येथील आनंद नगर येथे घरावर निबांचे झाड पडल्याने एकाच घरातील तिघांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात पावसामुळे मृत्यू होण्याची ही पाचवी घटना आहे.

झाड अंगावर कोसळल्यामुळे आईसह 2 बालकांचा मुत्यू झाला आहे. शारदा गुणवंत हिरडकर (28 ) असं आईचं नाव आहे तर सुष्टी गुणवंत हिरडकर (3)आणि ऋषिकेश  गुणवंत हिरडकर (2 )अशी मृत मुलांची नावं आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून क्रेनच्या मदतीने या तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

या तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तर पावसात सुरक्षा बागण्याची सुचना विभागात करण्यात आली आहे. एकाच घरातील तिघांनी पहिल्याच पावसात अशा पद्धतीने जीव गमावल्यामुळे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे तर संपूर्ण गावातून यावर शोककळा व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, आज दुपारपासून महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे. अचानक सोसाट्याचा वारा आणि पाऊस पडत असल्याने, बार्शीटाकळी तालुक्यातील वाघजाळी येथील  22 वर्षीय युवकाने इतर लोकांबरोबर पावसापासून बचावासाठी पातूर ते शिर्ला मार्गावर झाडाचा आसरा घेतला. मात्र, दुर्दैवाने त्या ठिकाणी वीज पडली आणि अभिजित श्रीकृष्ण इंगळे हा युवक इतर लोकांसह गंभीर जखमी झाला.

घटना घडताच त्याला तातडीने अकोल्यातील सरोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.  अभिजित सोबत झाडाखाली इतर उभे असलेले तिघे गंभीर जखमी आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

वर्धात वीज पडून आईचा मृत्यू झाला आहे तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. देवळी तालुक्यातील एकपाळा वाटखेडा शिवारातील घटना, पेरणी सुरू असताना अचानक विजांसह पाऊस आला. यावेळी वीज पडून ही घटना घडली आहे. सुमती कारोटकर असं मृत आईचं नाव आहे. जखमी मुलाचं नाव निलेश करोटकर असं आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस आणि विजांचामुळे एकाचा बळी गेला आहे. नागभीड तालुक्यातील बाळापूर येथे 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. चंदन प्रभाकर मैद असं मृत मुलाचं नाव आहे. शहर जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार तर अन्यत्र पावसाची रिपरिप सुरू आहे.

VIRAL FACT : तोंडावर पडणारा अपघाताचा हा व्हिडिओ कोल्हापुरातला? हे आहे सत्य

First published: June 22, 2019, 10:16 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading