कोकण किनारपट्टीसह गोव्यात हाय अलर्ट, समुद्रकिनाऱ्यांवर न जाण्याचा इशारा

monsoon वायू चक्रीवादळाचा पावसावर परिणाम, मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज

News18 Lokmat | Updated On: Jun 11, 2019 08:20 AM IST

कोकण किनारपट्टीसह गोव्यात हाय अलर्ट, समुद्रकिनाऱ्यांवर न जाण्याचा इशारा

मुंबई, 11 जून: उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना सोमवारी रात्री झालेल्या पावसानं दिलासा दिला खरा मात्र पुन्हा मंगळवारी सकाळी पावसानं उसंत घेतली. मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस झाल्यानं हवेत कमालीचा गारवा आहे.

मान्सूनपूर्व पावसानं राज्यात अनेक भागांमध्ये हजेरी लावली असली तरी मान्सूनची वाट मात्र शेतकरी आतूरतेनं पाहात आहे. पेरणीनंतर पावसानं दांडी मारली तर मोठं नुकसान होऊ नये म्हणून मान्सून वेळेत यावा यासाठी शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. दुसरीकडे कोकण किनारपट्टीसह गोव्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्यानं हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे समुद्रकिनारी न जाण्याचे प्रशासनानं आदेश दिले आहे.

मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक राज्यांमध्ये हवामान विभागाकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. 14 जूनला अरबी समुद्रातून येणाऱ्या वायू चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीसह गोव्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवस समुद्रात मासेमारांना जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.


अरबी समुद्रात धडकणार चक्रीवादळ

Loading...


या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासह कोकण भागात चांगला पाऊस पडेल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. या चक्रीवादळामुळे भारताच्या पश्चिम किनारपट्टीला अती सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोणीही अरबी समुद्रात जाऊ नये अशा सुचना जारी करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी अवकाळी आलेल्या पावसाने शेतीचं आणि फळबागांचं मोठं नुकसान झालं. तर जूनच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 11, 2019 08:20 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...