मुंबई, 23 जून : राज्यात पावसाला (Maharashtra monsoon rain update) हळूहळू सुरूवात झाली आहे कोकणासह, (Konkan rain update) राज्यातील काही भागात पावसाचा जोर वाढत आहे. दरम्यान मध्य प्रदेशातून येणाऱ्या जोराच्या वाऱ्यामुळे विदर्भातील (Vidarbha rain update) अनेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही हलक्या ते मध्यम पावसाला सुरूवात झाली आहे. उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यात (palghar rain) धुवाधार पाऊस झाला असून, पालघर येथे 207 मिलिमीटर, तर डहाणू येथे 130 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असला, तरी राज्याच्या अनेक भागांत पावसाची प्रतीक्षा आहे. दोन दिवसांपासून कोकण आणि घाटमाथ्यावर मान्सून सक्रिय झाल्याने पावसाची संततधार सुरू आहे. पालघर, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. तर मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरही पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत.
हे ही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहानानंतर बंडखोर आमदारांच्या सुरक्षेत मोठी वाढ; आसामाचे CM घेणार भेट
विदर्भात मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली आहे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली. जालना, उस्मानाबाद, परभणीसह मराठवाड्यातही हलक्या पावसाच्या सरी पडल्या. जून महिना उलटत आल्यानंतरही राज्यात मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.
पुणे जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने पुणेकरांना तुर्तास दिलासा मिळाला आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यात संततधार पाऊस असल्याने आतापर्यंत एकूण सरासरी 181 मिमी पाऊस झाल्याची माहिती हवामान खात्याकडून माहिती देण्यात आली. कोकणात सर्वदूर होणाऱ्या पावसाने भात शेतीच्या कामांना वेग आला आहे.
नगर जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. धुके, पाऊस, वादळ यांचा त्रिवेणी संगम कोकणातील काही भागात दिसायला मीळत आहे. परभणी हिंगोली जिल्ह्यातील ५८ मंडलांमध्ये मागच्या 24 तासांत हलका ते मध्यम पाऊस झाल्याने दिलासा मिळाला आहे. नांदेड जिल्ह्याच्या काही भागांत पाऊस पिकांना दिलासा मिळाला आहे.
हे ही वाचा : एकनाथ शिंदेंसोबत आता नेमके किती आमदार? गुवाहाटीमधल्या संख्येत मोठी वाढ
पावसाला पोषक हवामानामुळे कोकण किनारपट्टीसह राज्यात ढगांची दाटी झाली आहे. आज दक्षिण कोकणात जोरदार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा, विदर्भात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मॉन्सून संपूर्ण राज्य व्यापल्यानंतर कोकण, विदर्भासह अनेक भागांत पावसाला सुरुवात झाली आहे. खरिपाच्या पेरण्या होण्यासाठी आता जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. मंगळवारी सकाळपासून राज्यात ढगाळ हवामान झाल्याचे पाहायला मिळाले, तर कोकणात पावसाची रिपरिप सुरूच होती. आज (ता. २२) रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये जोरदार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' आहे. तर कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड, मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांचा घाटमाथा, तसेच विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर येथे तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाड्यातही वादळी पावसाला पोषक हवामान आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Monsoon, Rain, Weather, Weather forecast, Weather update, Weather warnings