व्याज वसूल करण्यासाठी सावकारांनं पत्नीला पाठवलं, पीडितेची केली अशी अवस्था

व्याज वसूल करण्यासाठी सावकारांनं पत्नीला पाठवलं, पीडितेची केली अशी अवस्था

देशासह राज्यात कोरोना व्हायरसचं थैमान घातलं असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

अहमदनगर, 1 मे: देशासह राज्यात कोरोना व्हायरसचं थैमान घातलं असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात खासगी सावकरी फोफावली आहे. व्याज वसूल करण्यासाठी एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आली आहे.

पारनेर तालुक्यांमध्ये व्याजाने घेतलेले पैसे वसूल करण्यासाठी एका सावकाराने चक्क त्याच्या पत्नीला वसुलीसाठी पाठवले होते. एवढ्यावरच न थांबता सावकाराच्या पत्नीने पीडित महिलेला बेदम मारहाणही केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

हेही वाचा.. आता करता येणार राज्यातल्या राज्यात प्रवास, सरकारची नवी नियमावली

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथे जवळा गावात सुनंदा दरेकर या महिलेने प्रकाश कोठावळे यांच्याकडून 2019 मध्ये 12 हजार रुपये व्याजाने घेतले होते. पीडित महिलेने सावकाराला आतापर्यंत 9 हजार 500 रुपये परत केल्याचा दावा केला आहे. मात्र, महिलेकडे 7 हजार 500 रुपये येणे बाकी असल्याचं सावकार सांगत आहे. या दरम्यान संबंधित महिलेला कुठेही काम मिळू शकले नाही. त्यामुळे महिला सावकाराचे पैसे देऊ शकली नाही. हे पैसे वसूल करण्यासाठी सावकाराने आपल्या पत्नीलाच महिलेकडे पाठवले.

महिला पैसे देत नसल्याचे पाहून सावकाराच्या पत्नीचा पारा चढला. तिने संबंधित महिलेला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. पैसे देण्यास महिलेने नकार दिला नाही. मात्र, काम मिळालं नाही मी पैसे देऊ शकत नाही असं सांगितलं होतं. तरी देखील महिलेला मारहाण करण्यात आली. या प्रकरणामध्ये संबंधित महिलेने पारनेर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. आता पोलिस खासगी सावकार आणि त्याच्य पत्नीवर काय कारवाई करतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा....अन्यथा परिस्थिती आणखी हाताबाहेर जाईल, या आमदाराने दिला राज्य सरकारला इशारा!

दरम्यान, कोरोनामुळे देशात लॉकडाऊन सुरु आहे. या काळात कोणाकडे पैशासाठी तगादा लावता येणार नसल्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. तरी देखील ग्रामीण भागात खासगी सावकार व्याजाच्या पैशासाठी सक्ती करताना दिसत आहे. ग्रामीण भागात अनेक सावकारी प्रकरणे आहेत. मात्र, याचे पुरावे कधीही सापडत नाही. त्यामुळे सर्व कारवाई करणे शक्य होत नाही. सावकाराच्या वसुलीमुळे अनेकांनी जिल्ह्यामध्ये या प्रकरणाकडे प्रशासनाने काळजीपूर्वक तपास करून कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

First published: May 1, 2020, 7:44 PM IST

ताज्या बातम्या