S M L

सावधान 'ब्लू व्हेल' नंतर 'मोमो' घेतोय बळी, राजस्थानमध्ये तरूणीची आत्महत्या

जगभर 'मोमो''चॅलेंजने धुमाकूळ घातलाय. या चॅलेंजचं लोण भारतातही आलं असून राजस्थानमध्ये एका तरूणीनं 'मोमो'च्या नादी लागून आत्महत्या केल्याने खबळब उडालीय.

News18 Lokmat | Updated On: Aug 19, 2018 04:32 PM IST

सावधान 'ब्लू व्हेल' नंतर 'मोमो' घेतोय बळी, राजस्थानमध्ये तरूणीची आत्महत्या

जयपूर,ता.19 ऑगस्ट : जगात आणि भारतात 'ब्लू व्हेल' या सोशल मीडियावरच्या गेमने अनेक तरूणांचा जीव घेतला. त्याचा प्रभाव कमी होत नाही तोच आता 'मोमो''चॅलेंजने धुमाकूळ घातलाय. या चॅलेंजचं लोण भारतातही आलं असून राजस्थानमध्ये एका तरूणीनं 'मोमो'च्या नादी लागून आत्महत्या केल्याची घटना समोर आल्यानं खळबळ उडाली असून य चॅलेंजचं आव्हान स्वीकारायचं कसं असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. राजस्थानातल्या ब्यावर इथल्या 10वीतल्या विद्यार्थीनीने 31 जुलैला आत्महत्या केली. या मुलीने सर्व कुटूंबियांसोबत तीन दिवसांपूर्वीच वाढदिवस साजरा केला होता. कुणाला कल्पानाही आली नाही की तीन दिवसांनंतर ही मुलगी अशी काही करेल. तीने घरात कुणी नसताना खोलीतल्या पंख्याला दोरी बांधून आत्महत्या केली. तीच्या शरीरावरच्या जखमा या मोमोच्या आहेत असंही स्पष्ट झालंय. या घटनेनं तीच्या कुटूंबियांना प्रचंड धक्का बसला आहे. या जीवघेण्या गेमचा हा भारतातला पहिला बळी असल्याचं बोललं जातंय.

BIG BREAKING : विरेंद्र तावडेनं रचला होता दाभोलकरांच्या हत्येचा कट-सीबीआय

व्हॉट्सअपच्या माध्यमातून हा गेम झापट्यानं पसरतोय. फेसबुकवर हा 'मोमो चॅलेंज' गेम आहे. त्यावर लॉगिन केलं की तुमच्या व्हॉट्सअॅपवर या गेमची माहिती येते आणि तुम्हाला मृत्यूकडे नेण्याची वाट दाखवली जाते. जपान, मोक्सिको आणि कोलंबिया इथल्या नंबरच्या माध्यमातून तुमच्याशी संपर्क ठेवला जातो आणि नवनवीन टास्क दिले जातात.एक टास्क पूर्ण केलं की दुसरं टास्क दिलं जातं. हे टास्क हळूहळू वाढवले जातात. ते पूर्ण केले नाहीत तर तुम्हाला घाबरवणारे फोटो पाठवून धमकावलं जातं. आत्महत्या हे या गेमचं शेवटचं टास्क आहे. आमच्या मुलीचा जीव गेला पण इतरांचा जावू नये म्हणून काहीतरी करा असं आवाहन पीडित मुलीच्या कुटूंबीयांनी पोलीस आणि सरकारला केलं आहे. तर याला रोखायचं कसं असा प्रश्न पोलिसांसमोर आहे.

20 आॅगस्टची डेडलाईन होती म्हणून माझ्या पतीला अटक,सचिन अंदुरेच्या पत्नीचा आरोप

मानसिकदृष्ट्या कमकूवत, निराश आणि अस्वस्थ, कमालीच्या संवेदनशील मुलं,मुली अशा गोष्टींना बळी पडतात असं मत मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. अशा मानसिक अस्थिर लोकांच्या मनाचा ताबा घेऊन असं अघोरी कृत्य करणारी टोळी जगभर कार्यरत आहे त्यामुळे डोकं ठिकाणावर ठेवून इंटरनेटच्या जगात वावरणं हाच त्यावर योग्य उपाय असल्याचंही तज्ज्ञांचं मत आहे.

Loading...
Loading...

 

जवान तुझे सलाम!, बाळाला केलं सुखरूप एअरलिफ्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 19, 2018 04:32 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close