बिडी आणण्यास नकार दिल्याने मुलगा फासावर, आईच्या प्रियकरानेचा केला घात

बिडी आणण्यास नकार दिल्याने मुलगा फासावर, आईच्या प्रियकरानेचा केला घात

सांगली जिल्ह्यातील मिरज येथे बिडी आणण्यास नकार दिल्याने प्रेयसीच्या 9 वर्षांच्या मुलाला फासावर लटकवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  • Share this:

सांगली, 16 जुलै : सांगली जिल्ह्यातील मिरज येथे बिडी आणण्यास नकार दिल्याने प्रेयसीच्या 9 वर्षांच्या मुलाला फासावर लटकवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्या कोवळ्या मुलाचा जागीच मृत्यू झाला असून आरोपी गणेश तळवारला नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.

खडसेंचा मूळ व्यवसाय शेती मग त्यांच्याकडे ऐवढी संपत्ती कशी ?

मिरजेच्या खॉजा वसाहतीमध्ये भाड्याच्या घरात ज्योती वाल्मिकी ही महिला आपल्या तीन मुलांसोबत राहते. रविवारी सकाळी ती बाजारासाठी जयसिंगपूर येथे गेली होती. तिचा प्रियकर आरोपी गणेश तळवार हा तिच्या झोपडीत आला होता. यावेळी ज्योतीच्या 9 वर्षाच्या गणेश या मुलाला त्याने बिडी आणण्यास सांगितले. यावेळी या मुलाने बिडी आणण्यास नकार दिला. त्यामुळे चिडून आरोपी गणेश तळवार याने त्या नऊ वर्षाच्या मुलाला पकडून झोपडीतील सुळीला दोरीने गळफास लावला. यात त्या कोवळ्या मुलाचा जागीच मृत्यू झाला.

सदरची बाब शेजारी नागरिकांना समजताच त्यांनी आरोपीला पकडून महात्मा गांधी चौक पोलिसांच्या ताब्यात दिले. आईच्या प्रियकराने क्षुल्लक कारणाने मुलाला गळफास देऊन खून केल्याने परिसरात हळहळ व्यक्य होत आहे.

हेही वाचाः

तिकीट विंडोवरून खरेदी केलेलं ट्रेनचं तिकीट मोबाईलवरून कसं कराल रद्द?

रेशम टिपनीस बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर

मुंबईत मुसळधार पाऊस, ठाणे आणि कोकणात अतिवृष्टीचा इशारा

 

First published: July 16, 2018, 10:18 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading