मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /IAS अधिकाऱ्याकडून IIT च्या विद्यार्थिनीसोबत अश्लिल कृत्य, पार्टीला बोलावून साधला डाव

IAS अधिकाऱ्याकडून IIT च्या विद्यार्थिनीसोबत अश्लिल कृत्य, पार्टीला बोलावून साधला डाव

इंटर्नशिप कार्यक्रमानिमित्त खुंटी येथे आलेल्या आयआयटीच्या विद्यार्थ्यांना एसडीएम रियाझ अहमद याने 1 जुलै रोजी त्यांच्या अधिकृत निवासस्थानी एका पार्टीसाठी आमंत्रित केले होते.

इंटर्नशिप कार्यक्रमानिमित्त खुंटी येथे आलेल्या आयआयटीच्या विद्यार्थ्यांना एसडीएम रियाझ अहमद याने 1 जुलै रोजी त्यांच्या अधिकृत निवासस्थानी एका पार्टीसाठी आमंत्रित केले होते.

इंटर्नशिप कार्यक्रमानिमित्त खुंटी येथे आलेल्या आयआयटीच्या विद्यार्थ्यांना एसडीएम रियाझ अहमद याने 1 जुलै रोजी त्यांच्या अधिकृत निवासस्थानी एका पार्टीसाठी आमंत्रित केले होते.

खूंटी, 5 जुलै : झारखंड राज्यातील खूंटी (Khunti Jharkhad) जिल्ह्यात इंटर्नशिपसाठी आलेल्या आयआयटीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग (IIT Student Molested by IAS Officer) करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी उपविभागीय दंडाधिकारी (SDM) सैयद रियाज अहमद याला ताब्यात घेतले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण - 

खूंटीचे पोलीस अधीक्षक अमन कुमार यांनी सांगितले की, खुंटी जिल्ह्यातील एसडीएम आणि 2019 बॅच आयएएस अधिकारी सय्यद रियाझ अहमद यांना हिमाचल प्रदेशातील आयआयटीमधून इंटर्नशिपसाठी येथे आलेल्या एका विद्यार्थिनीशी त्यांच्या निवासस्थानी विनयभंग आणि गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी त्यांची चौकशी केली जात आहे. या अधिकाऱ्याने शनिवारी 2 जुलै रोजी पीडितेचे चुंबन घेतले आणि त्याच्या राहत्या घरी या मुलीसोबत असभ्य वर्तन केले.

इंटर्नशिप कार्यक्रमानिमित्त खुंटी येथे आलेल्या आयआयटीच्या विद्यार्थ्यांना एसडीएम रियाझ अहमद याने 1 जुलै रोजी त्यांच्या अधिकृत निवासस्थानी एका पार्टीसाठी आमंत्रित केले होते. पीडित विद्यार्थिनीने दिलेल्या माहितीनुसार, ही पार्टी रात्रभर चालली. पार्टीनंतर जेव्हा ही विद्यार्थिनी आपल्या सहकारी विद्यार्थ्यांसोबत 2 जुलैला सकाळी निघणार होती, त्याचवेळी संधी साधून आयएएस अधिकाऱ्याने तिच्यासोबत अश्लिल कृत्य केले.

पीडितेने या घटनेची माहिती स्थानिक महिला पोलिस ठाण्यात दिली. मात्र, सोमवारी संध्याकाळी तिच्या वक्तव्यावरून एसडीएमविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला. त्यानंतर रात्री उशिरा आरोपी रियाझ अहमदला पोलिसांनी ताब्यात घेतले. एसपी म्हणाले की, पीडितेसह आठ आयआयटी विद्यार्थीनी आणि इतर अनेक विद्यार्थी या दिवसांत इंटर्नशिपसाठी खुंटीला आले आहेत.

हेही वाचा - साखरपुडा मोडला गेल्याने तरुणीचं टोकाचं पाऊल, होणारा पती अन् त्याच्या प्रेयसीवर गुन्हा दाखल

ते म्हणाले की, शनिवारी सायंकाळी उशिरा एसडीओ निवासस्थानी या प्रशिक्षणार्थींसाठी रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर ही घटना घडली. त्यांनी सांगितले की, एसडीएम रियाझ अहमद यांच्या विरोधात महिला पोलिस ठाण्यात आयपीसीच्या कलम 354 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First published:

Tags: Ias officer, IIT, Jharkhand, Sexual assault, Student