मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

मोहम्मद शमीचा खळबळजनक खुलासा, तीन वेळा केला होता आत्महत्या करण्याच्या विचार

मोहम्मद शमीचा खळबळजनक खुलासा, तीन वेळा केला होता आत्महत्या करण्याच्या विचार

भारतीय सलामीवीर रोहित शर्मासोबत (Rohit Sharma )इन्स्टाग्राम थेट चॅट दरम्यान मोहम्मद शमीनं हा खळबळजनक खुलासा केला.

भारतीय सलामीवीर रोहित शर्मासोबत (Rohit Sharma )इन्स्टाग्राम थेट चॅट दरम्यान मोहम्मद शमीनं हा खळबळजनक खुलासा केला.

भारतीय सलामीवीर रोहित शर्मासोबत (Rohit Sharma )इन्स्टाग्राम थेट चॅट दरम्यान मोहम्मद शमीनं हा खळबळजनक खुलासा केला.

  • Published by:  Manoj Khandekar
नवी दिल्ली, 02 मे : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami )माध्यमांसमोर धक्कादायक खुलासा केला आहे. क्रिकेट विश्वचषकानंतर तीनदा आत्महत्या करण्याचा विचार केल्याचा खळबळजनक खुलासा त्यानं केला आहे. त्या काळात दुखापतीतून सावरण्यासाठी मोहम्मद शमीला संघर्ष करावा लागला आणि खासगी समस्यांमुळे त्याला प्रचंड ताणतणावाचा सामना करावा लागला होता. अशा वेळी कुटुंबियांनी त्याला साथ दिली नाही तर ही अडचण दूर करू शकलो नसतो असं मोहम्मद शमीने सांगितलं. भारतीय सलामीवीर रोहित शर्मासोबत (Rohit Sharma )इन्स्टाग्राम थेट चॅट दरम्यान मोहम्मद शमीनं हा खळबळजनक खुलासा केला. गुडघ्याच्या दुखापतीनंतरही मोहम्मद शमी 2015 वर्ल्ड कपमध्ये खेळला. यानंतर पूर्णपणे फिट होण्यासाठी त्याला 18 महिने लागले. तो म्हणाला की, माझ्या आयुष्यातील हा सर्वात कठीण काळ होता. पुनर्वसन किती कठीण आहे आणि या वेळी मी कौटुंबिक समस्येशीही झगडत होतो. आयपीएलच्या एक-दोन आठवड्यांपूर्वी माझा अपघात झाला तेव्हा माझ्या समस्या आणखी वाढल्या असंही शमी म्हणाला. सोशल डिस्टन्स ठेवत पार पडलेल्या लग्नाचा VIDEO व्हायरल,काठी वापरून घातली 'वरमाला' जेव्हा मोहम्मद शमी क्रिकेट मैदानावर परत आला तेव्हा वैयक्तिक अडचणींनी त्याला घेरलं. त्याची पत्नी हसीन जहां हिने 2018 मध्ये घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. केवळ आपल्या कुटुंबाच्या पाठिंब्यामुळेच या समस्येतून बाहेर येणं शक्य असल्याचं शमीनं सांगितलं. यावेळी त्यानं तीन वेळा आत्महत्या करण्याचा विचारही केला होता. कुटुंबातील कोणी ना कोणी सोबत असायचं मोहम्मद शमी म्हणाला की, 'त्या काळात तो बर्‍याच मानसिक ताणतणावातून जात होता आणि यामुळे कुटुंबातील काही सदस्य नेहमीच त्याच्याबरोबर असायचे. कठीण परिस्थितीत कुटूंबापेक्षा मोठी शक्ती नाही. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मला मदत केल्याबद्दल मी माझ्या कुटुंबीयांचं आभारी मानतो.' शमी अखेर न्यूझीलंडमध्ये दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत मैदानावर दिसला होता. त्यावेळी तो किंग्ज इलेव्हन पंजाबकडून आयपीएल 2020मध्ये खेळणार होता पण कोरोना व्हायरसमुळे टी -20 लीग अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. VIDEO : उंच इमारतीच्या काचा पुसताना आला सोसाट्याचा वारा, पाहा काय झालं संपादन - रेणुका धायबर
First published:

Tags: Cricket, Rohit sharma

पुढील बातम्या