मोहम्मद अजहरुद्दीन यांच्यावर 20 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी 420 चा गुन्हा दाखल

मोहम्मद अजहरुद्दीन यांच्यावर 20 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी 420 चा गुन्हा दाखल

ट्रॅव्हल्स एजन्सीची फसवणूक केल्या प्रकरणी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन यांच्यासह तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

  • Share this:

सचिन जिरे, प्रतिनिधी

औरंगाबाद, 22 जानेवारी : ट्रॅव्हल्स एजन्सीची फसवणूक केल्या प्रकरणी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन यांच्यासह तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

औरंगाबादेतील दानिश टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सीचे चालक मोहम्मद शहाब यांच्या फिर्यादीवरून मोहम्मद अजहरुद्दीन यांच्याविरोधात 20 लाख 96 हजाराची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहम्मद अजहरुद्दीन यांनी नोव्हेंबर 2019 महिन्यात मुंबई-दुबई-पॅरिस आणि परतीचे विमानाचे तिकीट दानिश टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सीकडे बूक केले होते. त्यानंतर वारंवार पैशाची मागणी करून देखील पैसे मिळत नसल्याने एजन्सी चालकांची अखेर पोलिसात धाव घेतली.

काय आहे प्रकरण?

दानिश टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सीचे चालक मोहम्मद शहाब यांना 8 नोव्हेंबर 2019 रोजी मोहम्मद अजहरुद्दीन यांचे पीए मुजीब खान यांनी फोन करून तिकीट बूक करण्याचं सांगितलं होतं. यासाठी त्यांनी सुदेश अव्वेकल नावाच्या व्यक्तीशी बोलण्यास सांगितलं. त्यानंतर दोघांशी बोलून मोहम्मद अजहरुद्दीन यांचे 9 नोव्हेंबर 2019 आणि 12 नोव्हेंबर 2019 असे मुंबई- दुबई -पॅरीस प्रवासासाठी जाण्याचे आणि परतीचे विमान प्रवासाचे तिकीट बूक केले होते. तसंच सुदेश अव्वेकल यांचेही मुंबई- दुबई -पॅरीस आणि मुंबई- दुबई -दिल्ली असे परतीचे विमानाचे तिकीट बूक केले होते. दोन्ही तिकीटांची एकूण रक्कम ही 7,23,990 रुपये ठरले होते. त्यानंतर या तिकीटांचे पैसे मुजीब यांच्याकडे मागितले असता त्यांनी अकाऊंटची माहिती मागवून घेतली होती. त्यानंतर मुजीब यांनी पैसे पाठवतो म्हणून सांगितलं पण पैसे काही आले नाही.

त्यानंतर पुन्हा 10 नोव्हेंबर रोजी बराक आणि दमीर या व्यक्तीचे झगरब-मुनीक-टरीनसाठी विमान प्रवासाचे तिकीट बूक केले. या तिकिटांची किंमत ही 98,400 इतकी होती. त्यानंतर पुन्हा एकदा मोहम्मद अजहरुद्दीन, सारा लुईस डनहम आणि सुदेश अव्वकेल, अजय सिंह यांचेही विमानाचे तिकीट बूक केले होते. त्यानंतर त्यांनी आणखी 5 जणांची विमान प्रवासाची तिकीटं बूक करण्याचं सांगितलं. पण, मोहम्मद शहाब यांनी पैसे नसल्याचं सांगितलं. त्यानंतर मुजीब खान यांनी 10,60,000 रूपये शहाब यांच्या खात्यात पाठवले. परंतु, 2 दिवस झाले तरी पैसे खात्यात परत आले नाही. उलट आणखी तिकीटं बूक करण्यात आली होती. याची एकूण रक्कम ही 20, 96, 311 रुपयांच्या घरात पोहोचली. पण शहाब यांना कोणतेही पैसे देण्यात आले नाही. मुजीब यांनी पाठवलेल्या पैशांची शहाब यांनी बँकेत चौकशी केली असता असा कोणताही व्यवहार झालं नसल्याचं त्यांना कळालं. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं लक्ष्यात आल्यावर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

First published: January 22, 2020, 9:22 PM IST
Tags:

ताज्या बातम्या