नरेंद्र मोदींचा 'जेम्स बॉण्ड' घेणार का बदला?

केंद्र सरकारची भूमिका आणि नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती पाहाता भारत कसं उत्तर देतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. यात NSA अजित डोवाल यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 14, 2019 08:39 PM IST

नरेंद्र मोदींचा 'जेम्स बॉण्ड' घेणार का बदला?

पुलमावा इथल्या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्याने सर्व देश सुन्न झालाय. गेल्या 20 वर्षातला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला असल्याने सुरक्षा दलासमोर आव्हान निर्माण झालं आहे. हे बलिदान व्यर्थ जाणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. गृहमंत्री राजनाथसिंग, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चा केलीय. त्यानंतर दिल्लीत बैठकींना वेग आलाय. NSA अजित डोवाल 'खास' कामगिरीच्या तयारीसाठी लागले आहेत.

पुलवामाचा हल्ला हा सुरक्षा दलांच्या जिव्हारी लागलाय. या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी उच्च स्तरावर आता चर्चेला सुरुवात झाली आहे. उरीच्या हल्ल्यानंतरही देशभर संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर काही दिवस मी प्रचंड अस्वस्थ होतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ANIला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. त्यामुळे आता काय कारवाई होते याची चर्चा सुरू झालीय.

Loading...

उरी नंतर सर्जिकल स्ट्राईक करून लष्कराने आपल्या सामर्थ्याचं दर्शन घडवलं होतं. अजित डोवाल यांनी या कारवाईची आखणी केली होती. आताही अजित डोवाल सक्रिय झाले असून त्यांनी उच्चस्तरीय बैठकींना सुरुवातही केली आहे.

सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतरही अतिरेक्यांनी हा हल्ला केल्याने आता भारतीय लष्कर कसा बदला घेणार याची चर्चा सुरू झालीय. पाकिस्तानचा पाठिंबा असणाऱ्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हा हल्ला घडवून आणला आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे पाकिस्तानच याला जबाबदार आहे.

या हल्ल्यामुळे कारवाईसाठी सरकारवर दबाव येणार आहे. लोकसभेच्या निवडणुकाही तीन महिन्यांवर आल्याने लोकांच्या दबावाकडे सरकारला दुर्लक्ष करता येणार नाही. त्यामुळे लष्कर आणि हवाई दलाला मिळून ही योजना आखावी लागणार आहे असं मत सुरक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.

IB मध्ये असताना अजित डोवाल यांनी देशात अनेक ऑपरेशन्स यशस्वी केली आहेत. त्यामुळे त्यांना दांडगा अनुभव असून अशा योजना आखण्यात ते निष्णात समजले जातात. त्यामुळे याही वेळी अजित डोवाल यांच्याकडेच योजना आखण्याची जबाबदारी असणार आहे.

केंद्र सरकारची भूमिका आणि नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती पाहाता भारत कसं उत्तर देतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. अजित डोवाल हे मोदींचे खास विश्वासू असून गुप्त ऑपरेशन्सची योजना तयार करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं या त्यांच्या अनुभवाची आता कसोटी लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 14, 2019 08:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...