'काँग्रेसची सत्ता आली की राफेल प्रकरणी नरेंद्र मोदी जेलमध्ये जातील'

'चौकीदार' या शब्दावरून पुन्हा एकदा मोदींवर हल्ला करत राहुल गांधी यांनी निवडणुकीनंतर राफेलची चौकशी होईल आणि जेलमध्ये आणखी एक चौकीदार असेल असा इशाराच मोदींनी दिला होता.

News18 Lokmat | Updated On: Apr 13, 2019 05:55 PM IST

'काँग्रेसची सत्ता आली की राफेल प्रकरणी नरेंद्र मोदी जेलमध्ये जातील'

औरंगाबाद, 13 एप्रिल : 'काँग्रेसची सत्ता आली की नरेंद्र मोदी राफेल प्रकरणी जेलमध्ये जातील असा काँग्रेसचा ठाम विश्वास आहे.' असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत. राफेल प्रकरणावरून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अनेक आरोप केले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्या प्रत्येत भाषणातून राफेलमुद्द्यावर मोदींवर प्रहार केला.

लोकसभा निवडणूक 2019 मध्ये जर काँग्रेसची सत्ता आली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तुरुंगात जातील असं याआधीही राहुल  गांधी यांनी म्हटलं होतं. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले असताना राहुल गांधी यांनी नागपूर येथील सभेत पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवला होता.

'चौकीदार' या शब्दावरून पुन्हा एकदा मोदींवर हल्ला करत राहुल गांधी यांनी निवडणुकीनंतर राफेलची चौकशी होईल आणि जेलमध्ये आणखी एक चौकीदार असेल असा इशाराच मोदींनी दिला होता.

'मोदींचं वय झाल्यामुळे ते खोटं बोलतात. त्यामुळे जनतेला आश्वासन देत आहे', अशी टीका त्यांनी केली होती. तसंच 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त मोठ्या उद्योगपतींचं कर्ज माफ केलं. तीन राज्यांत आम्ही सत्ता आल्यानंतर तिथल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. महाराष्ट्रातही सत्ता आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू,' असं आश्वासनही राहुल गांधी यांनी यावेळी दिलं होतं.

हेही वाचा : कार आणि एसटीचा भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू

Loading...

राहुल गांधी यांचा गरिबी हटावचा नारा फार महत्त्वपूर्ण- पृथ्वीराज चव्हाण

सुनियोजित विकासासाठी तळागाळातील माणसाला रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या सुविधा देण्याबरोबरच अन्य व्यवसाय, उद्योगांमध्ये त्यांचा सहभाग वाढविणे आवश्यक असल्याचं प्रतिपादन पृथ्वीराज चव्हाण यांनी भाडिपा ‘लोकमंच’ वर केलं. ‘लोकमंच’ या उपक्रमांतर्गत भाडिपाच्या ‘विषय खोल’ या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जनतेशी त्यांनी थेट संवाद साधला होता.

आज हवी तेवढी गुंतवणुक नसल्यामुळे राज्यातील बेरोजगारी वाढत चालेली आहे. नव्या रोजगारासाठी नव्या उद्योगधंद्यांना चालना देत त्यासाठी पूरक वातावरण निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत शिक्षण संस्थामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची गरज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलून दाखविली.

आर्थिक स्थितीबाबत चिंता व्यक्त करताना राज्याच्या सर्व विभागांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न होणे आवश्यक असून काँग्रेस त्यासाठी प्रयत्नशील असून राहुल गांधीनी दिलेला ‘गरिबी हटाव’ हा नारा त्याच प्रयत्नांचा एक भाग असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

महिला सक्षमीकरणाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अर्थव्यवस्थेमध्ये जास्तीजास्त महिलांना सहभागी करणे आवश्यक असल्याचे सांगत महिलांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे हा आपला पहिला प्राधान्यक्रम असायला हवा व त्यासाठी ठोस कृतीची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.

साहित्य संघामध्ये रंगलेल्या या परिसंवादात पृथ्वीराज चव्हाण यांनी वेगवेगळ्या अनेक मुद्द्यांना स्पर्श करत आपला आजवरचा प्रवास ही उलगडला.


SPECIAL REPORT: कुणामुळे टळला राधाकृष्ण विखेंचा भाजप प्रवेश?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 13, 2019 05:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...