नितीश कुमार यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

नितीश कुमार यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

आता आज सकाळी 10 वाजता नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसंच उपमुख्यमंत्रीपदी सुशील मोदी यांनी शपथ घेतली

  • Share this:

27 जुलै : राजीनामा बाॅम्ब टाकल्यानंतर नितीशकुमार यांनी भाजपसोबत घरोबा केला. आणि आज सकाळी  10 वाजता नितीशकुमार यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसंच उपमुख्यमंत्रीपदी सुशील मोदी यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपालांनी दोन्ही नेत्यांना गोपनियतेची शपथ दिली.

'आता सहन होत नाही' असं म्हणत नितीशकुमार यांना तडकाफडकी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन भूकंप घडवला. त्यांच्या राजीनाम्यानंतर लगेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टि्वटरवर अभिनंदन केलं. त्यानंतर जेडीयू आणि भाजपच्या गोटात वेगवान घडामोडींना वेग आला.

भाजपने तातडीने कोअर कमिटीची बैठक बोलावली. या बैठकीनंतर भाजपने जेडीयूला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. या बैठकीत माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली.

तर जेडीयूने तातडीने बैठक बोलावली आणि नितीशकुमार यांनी विधानसभेच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली.सूत्रांनुसार नितीश कुमार यांच्या मंत्रीमंडळात 12 आमदार सामील करून घेतले जाणार आहेत.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 27, 2017 10:03 AM IST

ताज्या बातम्या