पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष पुतीन यांच्या भेटीचं काय आहे महत्व?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात आज अनौपचारिक शिखर परिषद होत आहे. रशियातल्या सोची या पर्टनस्थळी होत असलेल्या या शिखर परिषदे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

Ajay Kautikwar | News18 Lokmat | Updated On: May 21, 2018 11:13 AM IST

पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष पुतीन यांच्या भेटीचं काय आहे महत्व?

नवी दिल्ली,ता.21 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात आज अनौपचारिक शिखर परिषद होत आहे. रशियातल्या सोची या पर्टनस्थळी होत असलेल्या या शिखर परिषदे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

पुतीन यांची दोन आठवड्यांपूर्वीच रशियाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती त्यानंतर त्यांनी लगेचच मोदी यांना या परिषदेसाठी आमंत्रण दिलं होतं. या आधी वुहान इथं चीनचे अध्यक्ष शी जिनपींग आणि मोदी यांची अशीच अनौपचारिक शिखर परिषद झाली होती.

आंतरराष्ट्रीय राजकारणात अशा परिषदांना अतिशय महत्व असते. व्दिपक्षीय संबंधांवर या भेटीत विस्तृत चर्चा होणार आहे. या भेटीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि परराष्ट्र सचिव विजय गोखले हे रशियाच्या भेटीवर गेले होते. या भेटीत त्यांनी मोदी-पुतीन शिखर परिषदेची पूर्व तयारी केली होती.

काय आहे महत्व?

    Loading...

  • भारताची संरक्षण आयात आजही 80 टक्क्यांपर्यंत रशियाव अवलंबून आहे.
  • भारताची अमेरिकेशी जवळीक वाढत असल्यानं रशियाच्या मनात निर्माण झालेल्या शंका दूर करण्यास मदत होणार
  • आंतरराष्ट्रीय राजकारणातले रशियाचे महत्व वाढत असल्यानं दोन्ही देशांचे संबंध घनिष्ठ झाल्यास भारताला फायदा
  • अणुभट्ट्या उभारण्यात रशिया भारताला मदत करतोय, ऊर्जेची गरज भागवण्यास मदत.
  • पाकिस्तान रशियाच्या जवळ जात असल्यानं भारत रशियाला आपली चिंता व्यक्त करणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 21, 2018 11:13 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...