S M L

काँग्रेसींना औरंगजेबी राज्य लखलाभ असो- पंतप्रधान मोदी

काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी राहुल गांधींच्या नावाची औपचारिक घोषणा होणं अजून बाकी आहे. पण त्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना औरंगजेब ठरवून मोकळे झालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींच्या अध्यक्षपदाची तुलना थेट औरंगजेबाशी केली आहे. काँग्रेसला औरंगजेब राज्याच्या शुभेच्छा अशी उपहासात्मक टीका मोदींनी केली आहे.

Chandrakant Funde | Updated On: Dec 4, 2017 06:55 PM IST

काँग्रेसींना औरंगजेबी राज्य लखलाभ असो- पंतप्रधान मोदी

04 डिसेंबर, धरमपूर : काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी राहुल गांधींच्या नावाची औपचारिक घोषणा होणं अजून बाकी आहे. पण त्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना औरंगजेब ठरवून मोकळे झालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींच्या अध्यक्षपदाची तुलना थेट औरंगजेबाशी केली आहे. काँग्रेसला औरंगजेब राज्याच्या शुभेच्छा अशी उपहासात्मक टीका मोदींनी केली आहे. काँग्रेस नेते मणीशंकर अय्यर यांनी केलेल्या वक्तव्याचा दाखला देत मोदींनी हे वक्तव्य केलं.

गुजरातमधील धरमपूरच्या सभेत मोदींनी हे वक्तव्य केलंय. शहाजनानंतर औरंगजेबच राजा होणार हे जसं माहित होतं. तसंच काहिसं काहिसं काँग्रेसचं आहे. त्यामुळे काँग्रेसींना त्याचं औरंगजेबी राज्य लखलाभ असो, अशा शब्दात मोदींनी राहुल गांधींच्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीवर टीकास्त्रं सोडलंय. गुजरातमध्ये राहुल गांधींनी मोदींना त्यांच्यात होमपीचवर प्रथमच तगडं आव्हान दिलंय. त्यामुळेच मोदी यावेळी गुजरातमध्ये गेल्या महिन्याभरापासून तळ ठोकून आहेत. गुजरातच्या अस्मितेचा मुद्दा पुढे करून काँग्रेस गुजरातद्वेष्ठी असल्याचा आरोप ते प्रत्येक सभेतून करताहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 4, 2017 06:55 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close