काँग्रेसने मला जेलमध्ये टाकण्याचं षडयंत्र रचलं होतं - मोदी

काँग्रेसने मला जेलमध्ये टाकण्याचं षडयंत्र रचलं होतं - मोदी

'मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना काँग्रेसनं मला जेलमध्ये टाकण्याचं षडयंत्र रचलं होतं,' असा सणसणाटी आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्कालीन युपीए सरकारवर केलाय. गांधीनगरमधील गुजरात गौरव महासंमेलनात ते बोलत होते. गुजराज इलेक्शन काँग्रेसने विकासाच्या मुद्यावर लढून दाखवावं, असं खुलं आव्हानही मोदींनी यावेळी दिलंय.

  • Share this:

गांधीनगर, 16 ऑक्टोबर : 'मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना काँग्रेसनं मला जेलमध्ये टाकण्याचं षडयंत्र रचलं होतं,' असा सणसणाटी आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्कालीन युपीए सरकारवर केलाय. गांधीनगरमधील गुजरात गौरव महासंमेलनात ते बोलत होते. गुजराज इलेक्शन काँग्रेसने विकासाच्या मुद्यावर लढून दाखवावं, असं खुलं आव्हानही मोदींनी यावेळी दिलंय.

गुजरात निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच आक्रमक प्रवित्र्यात पाहायला मिळाले. गुजरातमध्ये काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जातीने प्रचार सुरू केलाय. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच काँग्रेसला सडेतोड प्रत्युत्तर दिलंय.

काँग्रेसने अगदी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या काळापासून कायमच गुजरातचा द्वेष केलाय. जनसंघ आणि भाजपला काँग्रेसवाल्यांनी कायमच पाहिलंय. पण 2014 जनतेनं आम्हाला भरभरून मतं देऊन देशाची सत्ता सोपवली, तरीही काँग्रेसचा भाजपच्या प्रती असलेला द्वेष कमी झालेला नाही. आताही गुजरातची जनता त्यांना मतपेटीतूनच प्रत्युत्तर देईल, असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.

नोटबंदी आणि जीएसटीवरून काँग्रेस जनतेमध्ये विनाकारण अपप्रचार करत असून गुजराती जनतेनं त्याकडे दुर्लक्ष करावं, असंही आवाहन मोदींनी केलंय. गुजरात इलेक्शनमध्ये भाजप किमान 150 जागा जिंकेल आणि काँग्रेसचा सफाया होईल, असा दावाही मोदींनी यावेळी केला.

First published: October 16, 2017, 7:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading