यांगून (म्यानमार), 6 सप्टेंबर : भारताची सफर करू इच्छिणाऱ्या म्यानमार वासियांसाठी मोफत व्हिसा उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केलीय. ते सध्या मान्यमार देशाच्या दौऱ्यावर आहेत. मोदींनी यावेळी भारताच्या ताब्यात असलेल्या 40 म्यानमारी मच्छिमारांची तात्काळ सुटका करणार असल्याचं जाहीर केलंय. 'आम्ही ‘न्यू इंडिया’ घडवत असून देशहितासाठी कठोर निर्णय घ्यायला घाबरत नाही. भ्रष्टाचार, दहशतवाद आणि गरिबीतून देशाला मुक्त करायचे आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.
म्यानमारच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजधानी यांगूनमध्ये अनिवासी भारतीयांशीही संवाद साधला. म्यानमार आणि भारत हे दोन्ही देश फक्त सीमांनीच नाही तर भावनांनीही एकत्र जोडलेले आहेत असंही मोदींनी म्हटलंय. म्यानमारच्या भूमीवरूनच सुभाष चंद्र बोस यांनी भारतीय स्वातंत्र्याचा नारा दिला होता. म्यानमारला वंदन केल्याशिवाय स्वातंत्र्याची चळवळ पूर्णच होऊ शकत नाही असंही ते म्हणाले.
1857 ke pehle swatantra sangram ke baad badshah Bahadur Shah Zafar ko do gaz zameen bhi isi dharti par mili thi: PM Modi in Myanmar pic.twitter.com/gh6yh3dZkk
— ANI (@ANI) September 6, 2017
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा