भारत आणि अमेरिका एकत्र येऊन जगाचे भविष्य बदलू शकतो- मोदी

भारत आणि अमेरिका एकत्र येऊन जगाचे भविष्य बदलू शकतो- मोदी

मानव जातीच्या कल्याणासाठी भारत आणि अमेरिका एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावर बदल घडवू शकतो, असा विश्वास भारताचे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी व्यक्त केलाय. तसेच भारताचं कौतुक केल्याबद्दल मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचेही आभार मानले. फिलीपाईन्सची राजधानी मनिला इथं भरलेल्या एशियान शिखर परिषदेत मोदी आणि ट्रम्प यांची भेट झाली.

  • Share this:

13 नोव्हेंबर, मनिला(फिलीपाईन्स) : मानव जातीच्या कल्याणासाठी भारत आणि अमेरिका एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावर बदल घडवू शकतो, असा विश्वास भारताचे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी व्यक्त केलाय. तसेच भारताचं कौतुक केल्याबद्दल मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचेही आभार मानले. फिलीपाईन्सची राजधानी मनिला इथं भरलेल्या एशियान शिखर परिषदेत मोदींनी हे विचार व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, '' विदेशी गुंतवणूकदारांनी भारतात येऊन मोठी गुंतवणूक करावी, यासाठी आम्ही भारतात कंपनी सुरू करण्याची प्रक्रिया आणखी सोपी केली असून, त्याद्वारे आम्ही भारताला जागतिक दर्जाचे उत्पादन केंद्र बनवू इच्छितो. यासाठी मागच्या तीन वर्षात आम्ही कालबाहय झालेले तब्बल 1200 कायदे रद्द केले असून, आम्ही भारतात मोठ्या प्रमाणावर कुशल कामगारही तयार करतो आहोत. आतापर्यंत भारतीय लोकसंख्येचा मोठा वर्ग बँक सुविधेपासून वंचित होता. जन धन योजनेमुळे ते चित्र बदलले. लाखो लोकांच्या आयुष्यात परिवर्तन झाले असे मोदींनी सांगितले. मिनिमम गर्व्हमेंट आणि मॅक्सिमम गव्हर्नन्सवर आमचा भर आहे. ''

भारतात आता डिजिटल व्यवहार मोठया प्रमाणात वाढले असून, लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत, असेही पंतप्रधान मोदींनी सांगितले. भारतात परिवर्तन घडवण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी वेगाने प्रयत्न सुरु आहेत. सोपे, परिणामकारक आणि पारदर्शक प्रशासनासाठी दिवस-रात्र मेहनत घेत असल्याचं मोदी म्हणाले.

आशियाई शिखर परिषदेतील भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील चर्चा महत्त्वपूर्ण मानली जात आहे. गेल्या सहा महिन्यांमधील मोदी आणि ट्रम्प यांच्यामधील ही दुसरी बैठक आहे. या बैठकीमधून ट्रम्प यांनी भारत हा अमेरिकेसाठी चीनपेक्षा कमी महत्त्वपूर्ण नसल्याचे दाखवून दिले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध सातत्याने सुधारले आहेत. यापूर्वी जर्मनी येथे झालेल्या जी 20 समिटमध्ये दोघांची भेट झाली होती. या दौऱ्यात पंतप्रधान भारतीय समुदायासमोर भाषणही करणार आहेत.

First published: November 13, 2017, 7:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading