ही कसली अफवा, कलशावर आधार कार्ड ठेवून पूजा केल्यास मोदी खात्यात पैसे पाठवतात

ही कसली अफवा, कलशावर आधार कार्ड ठेवून पूजा केल्यास मोदी खात्यात पैसे पाठवतात

सध्या करोनाच्या संकटामुळे लोकांमध्ये काहीशा प्रमाणात भीतीचं वातावरण पसरलं आहे. अशा परिस्थितीत अनेक ठिकाणी अफवाही पसरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं.

  • Share this:

नवी दिल्ली, 05 जून : यंदा देश अनेक संकटांचा सामना करत आहे. एकीकडे जीवघेणी महामारी कोरोना आणि दुसरीकडे हवामानातील बदलांमुळे येणारी चक्रीवादळं, त्यात लॉकडाऊनमुळे देश सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. देशात घडणाऱ्या सर्व घडामोडींवर सोशल मीडिया अतिशय प्रभावी काम करते. असंख्या बातम्या आणि अपडेट मोबाईलवर मिळतात, पण तितक्याच मोठ्या प्रमाणात अफवाही पसरवल्या जात आहे.

सध्या करोनाच्या संकटामुळे लोकांमध्ये काहीशा प्रमाणात भीतीचं वातावरण पसरलं आहे. अशा परिस्थितीत अनेक ठिकाणी अफवाही पसरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अशीच एक अफवा सध्या लोकांमध्ये पसरवण्यात आली आहे. त्यातली एक म्हणजे करोनाबाबत तर दुसरी होती पैशांबाबत. सूर्याची उपासना केल्यावर करोनाचा प्रादुर्भाव नष्ट होतो, अशी एक अफवा पसरवण्यात आली आहे. तर दुसरी म्हणजे कलशावर आधार कार्ड ठेवून पूजा केल्यानंतर सरकार आपल्या खात्यात पैसे जमा करतं. झारखंडमधील गढवा इथल्या मेरालमध्ये ही अफवा पसरवण्यात आली आहे.

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी, वाढत्या आकड्यांबद्दल महत्त्वाची माहिती समोर

पाहता पाहता या अफवा संपूर्ण गावभर पसरल्या आणि मेरोल व मझिगाव परिसरात नदीच्या किनारी महिला कलश आधारकार्ड घेऊन त्याची पूजा करतानाही दिसू लागल्या. पण अशात कोरोनाचा धोका अधिक वाढण्याची शक्यता आहे. अशा प्रकारची अफवा कोणी आणि का पसरवली याचा पोलीस तपास घेत असून अशा बाबींवर विश्वास ठेवू नका असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अफवांकडे दुर्लक्ष करण्यासाठी लोकांना जागरूक केलं जात आहे. आजकाल लोक विविध प्रकारचे पोस्ट करून कोरोनाबद्दल संभ्रम पसरवत आहेत. अशा परिस्थितीत लोकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. अशा अफवा पसरवणाऱ्यांवर पोलीस खातं लक्ष ठेवून आहे. सोशल मीडिया सेलने अशा पोस्टवर पाळत ठेवली आहे. कोरोनाविषयी अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कोरोनाची अफवा पसरवली जात असताना, लोक याचा मजाक उडवत ऑडिओ-व्हिडिओ पोस्ट करत आहेत, ज्यामुळे लोक आणखी घाबरले आहेत.

मॉल, मंदिर आणि रेस्टॉरंटसाठी नवी नियमावली, 8 जूनपासून होणार अंमलबजावणी

First published: June 5, 2020, 8:10 AM IST

ताज्या बातम्या