नवीन वर्षाआधीच मोदी सरकारची भेट, आता पुरुषांनाही मिळणार ७३० दिवसांची सुट्टी

एवढंच नाही तर केंद्र कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करुन अर्जित अवकाश नियमांध्येही काही बदल करण्यात आले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Dec 29, 2018 10:12 AM IST

नवीन वर्षाआधीच मोदी सरकारची भेट, आता पुरुषांनाही मिळणार ७३० दिवसांची सुट्टी

नवी दिल्ली, २९ डिसेंबर २०१८- नवीन वर्ष सुरु व्हायला आता काही दिवस उरले आहेत. पण त्याआधीच मोदी सरकारने कर्मचाऱ्यांना मोठी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. ७ व्या वेतन आयोगाकडून मुलांचा साभाळ करणाऱ्या एकट्या वडिलांना आता चाइल्ड केअर लीव देण्याची मागणी करण्यात आली होती. आधी ही सुट्टी फक्त महिला कर्मचाऱ्यांसाठी होती. मात्र आता ही सुट्टी पुरुषांनाही मिळणार आहे. यानुसार पुरुष कर्मचाऱ्यांना ७३० दिवसांची सुट्टी मुलांच्या देखभालीसाठी मिळणार आहे. ही सुविधा पत्नीचा मृत्यू तसचे मुलं १८ वर्षांपेक्षा कमी असतील तर त्यांना मिळणार आहे.

अर्जित अवकाशमध्येही बदल

एवढंच नाही तर केंद्र कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करुन अर्जित अवकाश नियमांध्येही काही बदल करण्यात आले आहेत. यानुसार, जानेवारी आणि जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी पाच दिवसांची अडवान्स लीव्ह प्रत्येक वर्षी त्यांच्या खात्यात जोडली जाईल.


VIDEO: भय्यू महाराजांच्या आत्महत्येपासून ब्लॅकमेलिंगपर्यंत...सेवादार विनायक पहिल्यांदाच कॅमेरासमोर

Loading...बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 29, 2018 10:12 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...