S M L

...जेव्हा दस्तुरखुद्द नरेंद्र मोदी पूजेसाठी पावती देतात

सोशल मडियावर सध्या एक ट्वीट व्हायरल होतंय,ज्यामध्ये असा दावा करण्यात आलाय की,पंतप्रधान मोदींकडून केदारनाथ इथे पूजेवेळी ६,५०० पावती देण्यात आलीय.

Sonali Deshpande | Updated On: May 8, 2017 03:15 PM IST

...जेव्हा दस्तुरखुद्द नरेंद्र मोदी पूजेसाठी पावती देतात

07 मे : सोशल मडियावर सध्या एक ट्वीट व्हायरल होतंय,ज्यामध्ये असा दावा करण्यात आलाय की,पंतप्रधान मोदींकडून केदारनाथ इथे पूजेवेळी ६,५०० पावती देण्यात आलीय.

पंतप्रधान मोदींनी यापूर्वीही अनेकदा असं सांगितलंय की, मी पंतप्रधान नसून मी एक प्रधानसेवक आहे.

आपल्याकडे अनेकदा व्हीव्हीआयपी संस्कृतीचं ओंगळवाणं दर्शन घडतं. याच संस्कृतीला धक्का देण्यासाठी केंद्र सरकारकडून काही दिवसांपूर्वीच मंत्र्यांच्या गाडीवरचे लाल दिवे हटवण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यावेळी मोदी असं म्हणाले होते की, भारतातला प्रत्येक नागरिकच व्हीआयपी आहे.आणि आता मोदींनी आपल्या कृत्यातून पुन्हा एकदा सर्वांनाच आश्चर्यचकित केलंय. सामान्य माणूस जशी केदारनाथ येथील पूजेसाठी पावती देतो तशीच पावती मोदींनीही दिल्याची चर्चा आहे.

३ मे रोजी नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच  केदारनाथला दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी मोदींच्या हस्ते तेथील मंदीरात पूजा करण्यात आली. या पूजेसाठी मोदींनी ६,५०० रू. ची पावती दिल्याचा दावा करत ती पावतीदेखील संन्यासी असलेल्या स्वामी निश्चलानंद यांनी ट्वीटरवरून शेअर केलीय.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 7, 2017 09:02 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close