PM Narendra Modi- सेन्सॉर बोर्डाची सिनेमातल्या 11 दृश्यांवर कात्री, दंगलीनंतरचा सीन हटवला

PM Narendra Modi- सेन्सॉर बोर्डाची सिनेमातल्या 11 दृश्यांवर कात्री, दंगलीनंतरचा सीन हटवला

बोर्डाने सिनेमातून सांप्रदायिक संवाद आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे थट्टा करणारे काही सीन काढून टाकण्यास सांगण्यात आले.

  • Share this:

मुंबई, १० एप्रिल- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय प्रवासावर तयार करण्यात आलेल्या पीएम नरेंद्र मोदी या सिनेमाला हिरवा कंदील देण्यात आल्यानंतर सेन्सॉर बोर्डानेही सिनेमाला क्लिन चीट दिली. सेन्सॉर बोर्डाने ‘U प्रमाणपत्र’ देण्यात आले आहे. मात्र सिनेमातील ११ सीनवर कात्री मारण्यात आली आहे. सिनेमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका अभिनेता विवेक ओबेरॉय साकारत आहे.

पीएम नरेंद्र मोदी सिनेमा एकूण २ तास १० मिनिटं आणि ५३ सेकंदांचा आहे. ११ एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. द प्रिंटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, सेन्सॉर बोर्डाने गेल्या आठवड्यात हा सिनेमा पाहिला. त्यानंतर बोर्डाने निर्मात्यांना काही सीन हटवण्यास तसेच काहींमध्ये बदल करण्यास सांगितले. बोर्डाने सिनेमातून सांप्रदायिक संवाद आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे थट्टा करणारे काही सीन काढून टाकण्यास सांगण्यात आले. रिपोर्टनुसार, सिनेमात काही अॅण्टी टेरर सीनही होते. जे सेन्सॉर बोर्डाने रद्द करण्यास सांगितले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सिनेमावर गंभीर आरोप केले होते. मनसेने म्हटलं होतं की, कोणताही सिनेमा प्रदर्शित होण्याच्या ५८ दिवस आधी त्याची कॉपी सेन्सॉर बोर्डाला द्यावी लागते. असा नियम असतानाही मोदींच्या आयुष्यावर तयार करण्यात आलेल्या या सिनेमाला विशेष सूट देण्यात आली. पीएम नरेंद्र मोदी सिनेमाची घोषणा जानेवारी महिन्यात करण्यात आली. त्यानंतर अवघ्या ३९ दिवसांमध्ये सिनेमा संपूर्ण चित्रीत करून तो प्रदर्शनासाठीही तयार झाला. या परिस्थितीत मनसेने सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षांकडे राजीनाम्याची मागणी केली.

VIDEO: काउंटडाउन सुरू; पहिल्या टप्प्यासाठी निवडणूक प्रशासन सज्ज

First published: April 10, 2019, 1:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading