नागपूर, 14 जुलै : प्रियकराने 20 वर्षीय मॉडेलची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह केळवद-पांढुर्णा मार्गावरील सावली भागात फेकल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण नागपुरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हेशाखा पोलिसांनी मॉडेलच्या मारेकरी प्रियकराला अटक केली आहे.
अशरफ अफसर शेख (21) असं आरोपीचं नाव आहे. तर खुशी ही बी.कॉम द्वितीय वर्षाला शिकत होती. खुशी शिक्षणासह मॉडेलिंग करायची. यातून मिळालेल्या पैशांतून खर्च भागवायची. ती डिगडोह येथील फ्लॅटमध्ये भाड्याने एकटी राहात होती. याच परिसरात तिचे आई-वडील आणि मावशी राहतात. सुमारे 6 महिन्यांपूर्वी खुशी आमि अशरफची नागपूरच्या फुटाळा भागात ओळख झाली.
काही दिवसांपूर्वीच दोघांनी लग्न करण्याचं निश्चित केलं. दरम्यान, खुशी ही अन्य तरुणांसोबत फिरत होती. शुक्रवारी रात्री खुशी आणि अशरफ कारने कळमेश्वरमधील शर्मा ढाब्यावर गेले. तेथे दोघांनी पार्टी केली. पण काही कारणावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर रागात आलेल्या अशरफने जड वस्तूने खुशीच्या डोक्यावर वार केले. खुशीची ओळख पटू नये यासाठी चेहऱ्यावर अॅसिड फेकून चेहरा विद्रुप करण्यात आला असावा तर तरुणीचा एक हातदेखील तोडला गेला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
डोक्यावर गंभीर दुखापत झाल्यामुळे खुशीचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेनंतर प्रत्यक्षदर्शींनी याबद्दल पोलिसांना माहिती दिली. गिट्टीखदान पोलिसांनी घटनास्थळावरून अशरफला अटक केली असून त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलीस आता प्रकरणाचा कसून तपास करत आहे.
नागपूरसारख्या शहरात तरुणीची अशा पद्धतीने हत्या होत असल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. तर आपल्या पोटच्या गोळ्या गमावल्यामुळे खुशीच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर गावातून यावर घटनेवर शोककळा व्यक्त केली जात आहे.
VIDEO: पत्नीने गर्लफ्रेंडसोबत पाहिलं पतीला, बेडरूममध्ये केली बेदम धुलाई!