इक्बाल कासकरविरोधात आता मोक्कांतर्गंतही गुन्हा !

इक्बाल कासकरविरोधात आता मोक्कांतर्गंतही गुन्हा !

ठाण्यातील बिल्डर खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या इक्बाल कासकर आणि त्याच्या साथीदारांवर अखेर मोक्का लावण्यात आला. कासकर सोबत छोटा शकीलचाही यात समावेश करण्यात आलाय. दाऊदचं नाव मात्र यातून वगळण्यात आलंय.

  • Share this:

रोहिणी गोसावी, प्रतिनिधी

मुंबई, 11 ऑक्टोबर : ठाण्यातील बिल्डर खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या इक्बाल कासकर आणि त्याच्या साथीदारांवर अखेर मोक्का लावण्यात आला. कासकर सोबत छोटा शकीलचाही यात समावेश करण्यात आलाय. दाऊदचं नाव मात्र यातून वगळण्यात आलंय. इक्बालसोबत पंकज गंगर, इसरार आणि मुमताजचाही यात समावेश करण्यात आलाय. आधीच नोंदवणयात आलेल्या तीन गुन्ह्यावरच हा मोक्का लावण्यात आलाय.

इक्बाल कासकरकडून मोठमोठे खुलासे

ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकानं 18 सप्टेंवर 2017 ला इक्बाल कासरकला खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली. त्यानंतर त्याच्या चौकशीत अनेक मोठमोठे खुलासे झाले. कधी दाऊदबद्दल, कधी छोटा शकील तर कधी अनिस इब्राहिम. अनेक गोष्टींचे खुलासे या चौकशी दरम्यान झालेत. खंडणीचं रॅकेट कसं चालवलं जातं, अनिस इब्राहिम इथल्या सावजांना फोन करुन दाऊदच्या नावानं धमक्या देतो, आणि पैसे द्यायला सांगतो, छोटा शकिल पाकिस्तानात बसून मुंबईतलं रॅकेट चालवतो. दाऊद आणि अनिस शी VOIP कॉलवरुन अनेकदा बोलल्याचाही खुलासा इक्बालनं चौकशीदरम्यान केलाय.

इसरार, मुमताज आणि पंगज गंगरचा रोल काय ?

मुमताज आणि इसरार हे इक्बाल कासकरचे खंडणीच्या व्यवसायातले साथीदार. सावज हेरणं त्याच्याशी प्राथमिक व्यवहार करणं, नंतर त्यांना इक्बाल कासकरच्या नावानं धमकावणं, सावजाची आपल्या फोनवरुन इक्बालशी बोलणं करुन देणं अशी कामं मुमताज आणि इसरार करायचे. इक्बालला अटक केल्यानंतर त्याच्यावर आणखी दोन गुन्हे नोंदवण्यात आले, तर मुमताज आणि इसरारवर आणखी एक गुन्हा नोदंवण्यात आला. पंकज गांगर हा बोरिवला मटका व्यापारी, मटक्याच्या धंद्यातून येणाऱ्या पैशांतून तो दर महिन्याला 10-15 लाख रुपये दाऊदला पाठवायचा. तसंच खंडणीच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या शुटर्सनाही तो पैसा पुरवायचा, त्यांच्या राहण्याची व्यवस्था करायचा.

इक्बालला गुटख्याचा व्यवसाय सुरु करायचा होता

इक्बालला मुंबईत गुटख्याचा व्यवसाय सुरु करायचा होता, अशी माहीती मिळालीये. त्यासाठी मुंबई आणि परिसरातील जागाही निश्चित करण्यात आली होती. या व्यवसायासाठी इक्बाल काही गुटखा व्यवसायिकांच्याही संपर्कात होता. हे गुटखा व्यापारीच त्याला त्याचा हा व्यवसाय सुरु करण्यात मदत करणार होते. महाराष्ट्रात गुटख्यावर बंदी असली तरीही भारतभर तसंच पाकिस्तान आणि दुबईत गुटख्याला मोठी मागणी असते. म्हणून अनिस इब्राहिमनं त्याला या व्यवसायात उतरण्याचा सल्ला दिला होता.

गोव्यात संपत्ती

खंडणीच्या माध्यमातून आलेला पैसा इक्बालनं दाऊद इब्राहिम आणि अनिसच्या सल्यानं गोव्यात गुंतवल्याची माहीती आहे. गोव्यात त्यानं या पैशातून मोठी संपत्ती गोळा केल्याची माहिती मिळतेय.

First published: October 11, 2017, 5:34 PM IST

ताज्या बातम्या