झारखंडमध्ये मॉब लिंचिंग; 22 वर्षाच्या मुस्लीम तरूणाचा मृत्यू

झारखंडमध्ये मॉब लिंचिंग; 22 वर्षाच्या मुस्लीम तरूणाचा मृत्यू

mob lynching : चोरीच्या संशयावरून 22 वर्षाच्या मुस्लीम तरूणाला जबर मारहाण करण्यात आली. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

रांची, 24 जून : झारखंडमध्ये 22 वर्षाच्या मुस्लीम तरूणाला विजेच्या खांबाला बांधून जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीनंतर उपचारादरम्यान तरूणाचा मृत्यू झाला आहे. खरसावा जिल्ह्यामध्ये ही घटना घडली आहे. 22 वर्षाचा तरबेज अन्सारी जमशेदपूरहून आपल्या गावी परतत होता. यावेळी त्याला चोरीच्या संशयावरून एका गावातील लोकांनी घेरलं. त्यानंतर गावकऱ्यांनी तरबेज अन्सारीला विजेच्या खांबाला बांधून जबर मारहाण केली. यावेळी त्याला जय श्री रामच्या घोषणा देण्यास देखील सांगण्यात आले. यावेळी तरूणाला बराच वेळ मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आलं. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरूणाला पोलिसांनी रूग्णालयात दाखल केले. पण, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या मारहाणीचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याच व्हिडीओच्या आधारे पोलीस सध्या चौकशी करत आहेत.

दबंग पोलीस अधीक्षक; बलात्काराच्या आरोपीला घातल्या गोळ्या

मुस्लीम असल्यानं मारहाण

तरबेजच्या मृत्यूनंतर तरबेजच्या नातेवाईकांनी त्याच्या नावावरून मारहाण करण्यात आल्याचा आरोप केला. यावेळी 24 वर्षाच्या तरबेज अन्सारीला जय श्री राम आणि जय हनुमानच्या घोषणा देण्यास देखील सांगण्यात आले. तरबेजच्या नातेवाईकांनी मारहाण करणाऱ्या सर्वांना तात्काळ अटक करा अशी मागणी केली आहे. मारहाणीत मृत्यू झालेला तरबेज हा पुण्यात वेल्डींगचं काम करत होता. ईद निमित्त तो आपल्या मुळ गावी गेला होता.

VIDEO: युतीमध्ये मुख्यमंत्री पदावरून वाद, आठवलेंनी दिला नवा फॉर्मुला

First published: June 24, 2019, 11:01 AM IST

ताज्या बातम्या