मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /...तर अफवांमुळे बळी गेलेल्यांचा जीव वाचला असता

...तर अफवांमुळे बळी गेलेल्यांचा जीव वाचला असता

ही सर्व माणसं भिक्षा मागून पोट भरणारी असून पाचही लोक सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील खवे या गावातील रहिवासी आहेत.

ही सर्व माणसं भिक्षा मागून पोट भरणारी असून पाचही लोक सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील खवे या गावातील रहिवासी आहेत.

ही सर्व माणसं भिक्षा मागून पोट भरणारी असून पाचही लोक सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील खवे या गावातील रहिवासी आहेत.

    धुळे ता,1 जुलै : साक्री तालु्क्यातल्या राईनपाडा इथं अफवेचा बळी ठरलेल्या सर्व माणसांची ओळख पटली आहे. ही सर्व माणसं भिक्षा मागून पोट भरणारी असून पाचही लोक सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील खवे या गावातील रहिवासी आहेत. डवरी समाजातले हे सर्व जण भिक्षा मागत गावोगाव फिरत आपलं पोट भरणारी आहेत.

    भिक्षा मागायला गेलेल्यांना त्यांच्या नातेवाईकांनी न जाण्याचा आग्रह केला होता. सध्या वातावरण खराब आहे. लोक आक्रमक झाले आहेत त्यामुळे भिक्षा मागायला जावू नका असा आग्रह काही जणांच्या कुटूंबियांनी धरला होता. मात्र आपण गरीब लोक आहोत आपल्याला कोण मारणार या विचाराने या सर्व लोकांनी घरं सोडलं. आमचं ऐकलं असतं तर यांचा जीव वाचला असता असं त्यांच्या नातेवाईकांनी म्हटलं आहे.

    पिंपळनेरच्या सरकारी दवाखान्यात सर्व मृतदेहांच पोस्टमार्टेम करण्यात आलं. त्यावेळी मृतांचे काही नातेवाईक तिथे आले आणि त्यांच्या आक्रोशाने सर्व परिसर हेलावून गेला. माय जेवायला देत नाही आणि बाप भिक मागू देत नाही, आता तुम्हीच सांगा आम्ही पोट भरायचं कसं असा सवाल या नातेवाईकांनी केला.

     

    मृतांची नावं

    1) भारत शंकर भोसले

    2) दादाराव शंकर भोसले

    3) भारत शंकर मालवे

    4) अप्पा श्रीमंत भोसले

    5) राजू भोसले

    काय घडलं राईनपाड्यात?

    धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. मुलं चोरणाऱ्या टोळीच्या संशयावरून राईनपाडा इथं जमावाने 5 जणांची निघृण हत्या केली. दुपारी 12 च्या सुमारास ही घटना घडलीय. या प्रकरणी 10 जणांना पोलीसांनी अटक केली आहे.

    राईनपाडा आणि परिसर हा आदीवासी पाड्यांचा भाग आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात मुलं चोरणारी टोळी फिरत असल्याची अफवा होती. आज राईनपाडा इथं आठवडी बाजार होता त्यामुळं लोकांची गर्दी होती. आठवडी बाजारामुळं आफवेची चर्चा जास्त झाली.

    संशयावरून काही लोकांनी पाच जणांना ताब्यात घेतलं आणि त्यांना ग्रामपंचायतीच्या खोलीत कोंडून ठेवलं. संत्पत नागरिकांनी या ग्रामपंचायतीला वेढा घातला आणि कार्यालयाची दारं खिडक्या तोडून ते आत घुसले आणि पाचही जणांना प्रचंड मारहाण केली. लाकडाच्या दांडक्याने मारत त्यांना ठार केलं.

     

    First published:
    top videos

      Tags: Child theft, Dhule, Mob lynching, Rumours, Sakri, Solapur