हरिसाल गावातील उपसरपंचाच्या FB LIVE वर मनसेची पहिली प्रतिक्रिया

हरिसाल गावातील उपसरपंचाच्या FB LIVE वर मनसेची पहिली प्रतिक्रिया

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी सरकारने पहिलं डिजीटल गाव म्हणून विदर्भातल्या हरिसाल या गावाबद्दलचं 'वास्तव' मांडलं होतं. परंतु, आज हरिसाल गावातील उपसरपंचाने फेसबुक लाईव्ह करून राज ठाकरेंचा व्हिडिओ चुकीचा असल्याचा दावा केला होता.

  • Share this:

मुंबई, 22 एप्रिल : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या जाहीर सभांमधून 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत मोदी सरकारने पहिलं डिजीटल गाव म्हणून विदर्भातल्या हरिसाल या गावाबद्दलचं 'वास्तव' मांडलं होतं. परंतु, आज याच हरिसाल गावातील उपसरपंचाने फेसबुक लाईव्ह करून राज ठाकरेंचा व्हिडिओ चुकीचा असल्याचा दावा केला होता. यावर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी 'आता तुम्ही मोदींचं फेसबुक लाईव्ह करा किंवा सोन्याची घरं बांधा तरी तुम्ही फेकूच आहात' अशी टीका केली आहे.

अमरावती जिल्ह्यातल्या हरिसाल गावाबाबतचा व्हिडिओ राज ठाकरेंनी सभेमध्ये दाखवला होता. हा व्हिडिओ चुकीचा असल्याचा दावा उपसरपंच गणेश महादेव येवले यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केला आहे. संदीप देशपांडे यांनी यावबद्दल टि्वटकरून आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'आता हरिसालच्या सरपंचाचा जबरदस्तीने फेसबुक लाईव्ह करा किंवा पंतप्रधानांचं करा नाहीतर हरिसालमध्ये सोन्याची घरं बांधा लोकांना पक्क समजलं आहे की तुम्ही फेकू आहात' असं प्रत्युत्तर दिलं आहे.

आज दुपारी उपसरपंच गणेश महादेव येवले यांनी फेसबुक लाईव्ह करून राज ठाकरे यांचा दावा खोडून काढला होता. "राज ठाकरेंनी हरिसाल गावाची जी देशभरात बदनामी केली आहे. हरिसाल गावाविषयी जो व्हिडिओ दाखवला आहे, तो पूर्णपणे खोटा आहे", असं येवले म्हणाले. "आज जर गावात इंटरनेट नसते तर आज मी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधू शकलो नसतो", अशा त्यांनी या लाईव्ह व्हिडिओतून व्यक्त केल्या आहेत.

आमच्या गावाच्या शाळेत काँप्युटर लॅब देण्यात आली आहे. येथे एचपी, माइक्रो सॉफ्ट, जल्दीफाय अशा कंपन्यांच्या मदतीने तंत्रज्ञान पोहोचले आहे. गावातील इंटरनेट व्यवस्थित काम करतंय, असेही त्यांनी यावेळी सांगितले. राज ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रात हरिसालची बदनामी करत आहेत, त्यांनी केवळ राजकीय फायद्यासाठी हे केले आहे, असंही ते या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटलं आहे. यासबंधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.

'गाव डिजिटल झाल्यामुळे पर्यटनास फायदा'

उपसरपंच येवले यांनी गावातल्या महिला आणि इतर तरुणांनाही या लाईव्ह व्हिडिओत बोलतं केलं आहे. शिवाय त्यांनी डिजिटल रूमही यात दाखवली आहे. "हरिसाल गाव जेव्हापासून डिजिटल झाले आहे, तेव्हापासून गावाच्या पर्यटनाला त्याचा फायदा झाला आहे. आम्ही एकूण दहा गाईड या गावात काम करतो. मात्र गावाच्या पर्यटनाविषयी जनतेला माहिती मिळाली ती फेसबुक आणि व्हॉट्सअॅपमुळे", अशी माहिती अशोक आठवले या गावकऱ्यानी यावेळी दिली. गाव डिजिटल झाल्यापासून गावाला इंटरनेट सुविधा मिळाली ज्यामुळे गावाच्या पर्यटनाविषयी माहिती देणारे फेसबुक पेज सुरू करता आलं, असं ते सांगतात.

गावातील काही विद्यार्थिनी आणि महिलांशी संवाद साधलेला या व्हिडिओत दिसतो. "इंटरनेट आल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात फायदा मिळाला आहे. यामुळे त्यांना रोजगार मिळाला आहे. अनेक महिलांना येथे मशीन ट्रेनिंग देण्यात आले आहे. ऑनलाइन व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना शिवणकाम, बॅग्स बनविण्याचे काम अशा अनेक कामांचे प्रशिक्षण देण्यात येते. यामुळे हरिसाल गावातील महिला सक्षम झाल्या आहेत", असं एका महिलेनं सांगितलं.

उपसरपंचांनी येथील विविध दुकानदारांशी संवाद साधला. यावेळी गावकऱ्यांनी इंटरनेट व्यवस्थित चालत असल्याचे सांगितलं. "आम्हाला कुणीही हे बोलण्यास भाग पाडलेलं नाही", असंही काही गावकरी व्हिडिओतून सांगताना दिसतात.

'राजकारण खालच्या पातळीचं'

हरिसाल गावातील पंचायत समिती सदस्य रामविलास दहिकर यांनी यावेळी सांगितले की, "गावात इंटरनेट आल्यामुळे तसेच गाव डिजीटल झाल्यामुळे येथील युवकांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. इंटरनेटमुळे येथील युवा पिढीला अनेक गोष्टींची, रोजगाराची, स्पर्धा परीक्षांची माहिती मिळते, त्यामुळे राज ठाकरे यांनी जे आरोप हरिसाल गावावर लावले आहेत, ते खोटे आहेत व ते अतिशय खालच्या पातळीचे राजकारण करत आहेत असंही ते यावेळी म्हणाले.

यावेळी उपसरपंचांनी डिजीटल या गावात काय शक्य आहे, याचे प्रात्यक्षिक दाखवले. यावेळी ऑनलाइन पैसे ट्रांसफर करणे, ड्रायव्हिंग लायसेंससाठी तसेच आधार कार्ड साठी ऑनलाइन फॉर्म भरणे अशा सर्व गोष्टी हरिसाल गावात शक्य असल्याचे या व्हिडिओ मधून स्पष्ट झाले आहे.

====================================

First Published: Apr 22, 2019 11:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading