VIDEO : 'पप्पू पुन्हा नापास झाला',मनसेसैनिकांनी राम कदमांच्या घराबाहेर लावले बॅनर

VIDEO : 'पप्पू पुन्हा नापास झाला',मनसेसैनिकांनी राम कदमांच्या घराबाहेर लावले बॅनर

आमदार राम कदम यांचा दहीहंडी उत्सवाचा यात संदर्भ देण्यात आला आहे.

  • Share this:

23 आॅगस्ट : मुंबईतल्या आमदारांनी आपल्या मतदारसंघात किती काम केली तसंच विधिमंडळ सभागृहात किती हजर राहून प्रश्न विचारले याचा अहवाल प्रजा फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीनं अहवाल सादर केला.

नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या या अहवालात मुंबईमधील आमदारांच्या कामगिरीच्या आकडेवारीत घाटकोपर पश्चिमचे भाजप आमदार प्रवक्ते राम कदम यांना शेवटचे म्हणजे ३२ वे स्थान देण्यात आले आहे. या वरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांची खिल्ली उडवीत अभिनंदन करणारे फ्लेक्स घाटकोपर च्या चौकाचौकात तसंच राम कदम यांच्या घरासमोर लावले आहेत.

आमदार राम कदम यांचा दहीहंडी उत्सवाचा यात संदर्भ देण्यात आला आहे. विभागात विकास कामे होत नसल्याने प्रजा फाउंडेशन ने दिलेल्या या अहवालातून तो समोर आला असून राम कदम यांचे याकडे लक्ष वेधण्यासाठी फ्लेक्स लावल्याचे मनसे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी सांगितले.

मुंबईत काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी पहिल्या क्रमांकाचा मान पटकावला आहे. गेली 3 वर्ष ते सातत्याने क्रमांक एकवर राहण्याचा बहुमान पटकावलाय. तर भाजपचे आमदार राम कदम यांचा शेवटून पहिला नंबर म्हणजे 32 वा क्रमांकावर आहे.

प्रजा फाऊंडेशन आमदारांचं रिपोर्ट कार्ड जाहीर केलंय. या अहवालानुसार अमीन पटेल हे मुंबईतले क्रमांक एकचे आमदार आहेत. गेली 3 वर्षे सातत्याने ते क्रमांक 1 वर राहण्यात यशस्वी ठरलेत. तर त्यांच्यानंतर शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर 3 क्रमांकावर  अतुल भातखलकर आहे. घाटकोपरचे भाजपचे आमदार राम कदम हे शेवटच्या म्हणजेच 32 व्या क्रमांकावर आहेत.

असा केला जातोय सर्व्हे

भारतीय राज्य घटनेमध्ये आमदारांसाठी कामाची नियमावली केली आहे. या नियमावलीनुसार प्रजा फाऊंडेशनने आमदारांचं प्रगतीपुस्तक काढलंय. यामध्ये आमदाराचे काम, विधानसभेत हजेरी, मागील आणि चालू कामाचा आढावा घेतला जातोय. या बद्दल नागरिकांचा सर्व्हे केला जातो. विधानसभेत त्यांनी किती प्रश्न विचारले किती प्रश्न उपस्थितीत केले याबद्दल विचार केला जातो. गुन्हेगारीबद्दल आमदारांवर किती गुन्हे दाखल आहे याचाही विचार केला जातोय. यात 40 टक्के गूण हे जनतेच्या मतांवर आधारीत असतात.

 

VIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 23, 2018 11:27 PM IST

ताज्या बातम्या