राज ठाकरेंविरोधात अश्लील शिव्या देत केली फेसबूक पोस्ट, मनसे कार्यकर्त्यांनी डॉक्टरांना धुतलं

वैजापूर तालुक्यातील लाड़गाव येथील डॉ. शत्रुघ्न थोरात यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुकवर राज ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण करून अशील शिव्या दिल्या होत्या.

News18 Lokmat | Updated On: Feb 25, 2019 07:05 PM IST

राज ठाकरेंविरोधात अश्लील शिव्या देत केली फेसबूक पोस्ट, मनसे कार्यकर्त्यांनी डॉक्टरांना धुतलं

औरंगाबाद, 25 फेब्रुवारी : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर टाकल्याच्या कारणावरून मनसे कार्यकर्त्यांनी एका डॉक्टरला चोप दिला आहे. ही घटना औरंगाबादमधील वैजापूर तालुक्यात समोर आली आहे.

वैजापूर तालुक्यातील लाड़गाव येथील डॉ. शत्रुघ्न थोरात यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुकवर राज ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण करून अशील शिव्या दिल्या होत्या. त्यामुळे संतप्त झालेल्या वैजापूर तालुक्यातील मनसे कार्यकर्त्यांनी सोमवारी थोरात यांच्या दवाखान्यात राडा घातला. डॉ. थोरात यांना बेदम मारहाण करण्यात आली.

संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी थोरात यांना चोप देत अंगावर काळी शाई फेकून त्यांचा निषेध केला. कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीनंतर अखेर डॉक्टर थोरात यांनी माफी मागून आपली सुटका करून घेतली. दरम्यान राज ठाकरे हे सध्या आंगणेवाडीच्या यात्रेला भेट देण्यासाठी गेले होते.

...जेव्हा स्वत: काढलेल्या व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाला राज ठाकरे भेट देतात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आंगणेवाडी यात्रेला हजेरी लावत भराडी देवीचे दर्शन घेतलं. याठिकाणी प्रथमच त्यांनी स्वत: काढलेल्या व्यंगचित्रांचं प्रदर्शन भरविण्यात आलं आहे. भराडी देवीच्या दर्शनानंतर त्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत मनसे नेते बाळा नांदगावकर, नितिन सरदेसाई आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Loading...


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 25, 2019 07:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...