मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

मनसे भविष्यात भाजपला देणार साथ? बाळा नांदगावकरांचं धक्कादायक विधान

मनसे भविष्यात भाजपला देणार साथ? बाळा नांदगावकरांचं धक्कादायक विधान

या विधानामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही भाजपाला साथ देणार का ? महायुतीमधून शिवसेना बाहेर पडल्याने शिवसेनेची हिंदुत्त्वाची पोकळी मनसे भरून काढणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात.

या विधानामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही भाजपाला साथ देणार का ? महायुतीमधून शिवसेना बाहेर पडल्याने शिवसेनेची हिंदुत्त्वाची पोकळी मनसे भरून काढणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात.

या विधानामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही भाजपाला साथ देणार का ? महायुतीमधून शिवसेना बाहेर पडल्याने शिवसेनेची हिंदुत्त्वाची पोकळी मनसे भरून काढणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात.

  • Published by:  Renuka Dhaybar

मुंबई, 06 जानेवारी : गेल्या काही वर्षांपासून सतत पराभवाचे धक्के खात असलेली मनसे आता कात टाकणार आहे. याचाच एक भाग म्हणून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक मोठा निर्णय घेतला. मनसेचा असलेला पंचरंगी झेंडा आता बदलणार आहे. आत्तापर्यंत मनसेच्या अजेंड्यावर मराठीच्या मुद्या अग्रभागी होता. आता त्याचसोबतच मनसे हिंदुत्वाचा मुद्दाही आक्रमकपणे लावू धरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे मनसे भविष्यात भाजपची साथ देणार अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. याविषयी एका मराठी वृत्तवाहिनीने प्रश्न विचारला असता मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी धक्कादायक विधान केलं आहे.

बाळा नांदगावकर म्हणाले की, 'भविष्यात मनसे कोणासोबत समीकरण जुळवेल सांगू शकत नाही. पण आम्ही शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, शेकाप, राजू शेट्टी या सगळ्यांना मदत केली आहे. त्याचा कोणाला किती फायदा झाला हे सांगू शकत नाही. त्यामुळे आम्ही कोणासोबत जायचं हा निर्णय पक्षप्रमुख घेतील. पण राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतं. पक्षाने एक लाईन घेतली तर काहीही चमत्कार होऊ शकतो. त्यामुळे सध्या लोकांच्या मनात जे आहे ते घडताना पाहायला मिळेल'

बाळा नांदगावकरांच्या या विधानमुळे मनसे हिंदुत्वाचा नारा देत भाजपला मदत करणार का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. येत्या 23 जानेवारीला मनसेचं महाअधिवेशन मुंबईत होत असून त्यात राज ठाकरे पक्षाचं नवं धोरण जाहीर करणार आहेत. मनसेच्या राजकीय वाटचालीत हा निर्णय सर्वात महत्त्वाचा ठरणार असून मनसेला हा बदल यश मिळवून देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

सध्याच्या मनसेच्या झेंड्यात निळा, भगवा, पांढरा आणि हिरवा असे रंग आहेत तर मध्ये पक्षाचं चिन्ह असलेलं इंजिन आहे. नव्या झेंड्यात सर्व चारही रंग जाणार असून फक्त भगवा रंग असणार आहे आणि मध्यभागी 'शिवराजमुद्रा' असणार आहे. हा बदल म्हणजे मनसेची हिंदुत्वाकडे असलेली वाटचाल असल्याचं म्हटलं जातंय.

इतर बातम्या - काका पवारांच्या तालमीतले दोन्ही पैलवान 'महाराष्ट्र केसरी'च्या आखाड्यात आमनसामने

राज्यात बदलती राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे नवी खेळी खेळण्याच्या तयारीत आहे. शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जात राज्यात सरकार स्थापन केलं. काँग्रेससोबत गेल्याने शिवसेनाला आपली कडवी भूमिका थोडी मवाळ करावी लागली होती. त्यामुळे शिवसेनेचा कट्टर हिंदुत्ववादी मतदार आपल्याकडे खेचण्यासाठी मनसे नवी भूमिका स्वीकारणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान मनसेच्या या नव्या भगवीकरणावर पुण्याच्या शिवसैनिकांनी चक्क स्वागत केलंय. काहीनी तर चक्क मनसेला सेनेत विलीन करण्याचा सल्ला दिला.  पण हे सांगतानाच शिवसेनेचं हिंदुत्व अद्यापही कडवटच असल्याचं सांगायला ते विसरले नाहीत.

इतर बातम्या - दिलेला शब्द पाळणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार - संजय राऊत

23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. यादिवशी मनसेचं महाअधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनात राज ठाकरे पक्षाला नवी दिशा देण्यावर कार्यकर्त्यांना उभारी देणार आहे. याच दिवशी आता राज ठाकरे मराठ अस्मितेसोबतच हिंदुत्वाचीही मोट बांधणार आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्याने शिवसेनेने हिंदुत्वाबाबात मवाळ भूमिका घेतली असल्याची चर्चा आहे. ती निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी मनसे आता नवी भूमिका स्वीकारणार असल्याची चर्चा असून राज्याच्या राजकारणात नवं वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

राज ठाकरेंच्या तुफान भाषणांमुळे मनसे सुवर्णकाळ सुरू झाला. पण 2013 नंतर मात्र मनसेचा पडता काळ सुरू झाला. यानंतर प्रत्येक कार्यक्रमांमधून राज ठाकरे कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करत राहिले पण त्यांची मतांची झोळी रिकामी झाली. अखेर आता पक्षाला पुन्हा उभं करण्यासाठी मसने हिंदुत्वाचीही मोट बांधणार आहे.

इतर बातम्या - फडणवीस सरकारला जमलं नाही ते ठाकरे करून दाखवणार, मराठी भाषेवर मोठा निर्णय

First published:

Tags: BJP, Lok sabha election 2019, Maharashtra, Shivsena, भाजप, मनसे, महाराष्ट्र, राज ठाकरे, राष्ट्रवादी, शरद पवार