ऐरोली टोलनाका मनसेनं बंद पाडला ; पिवळ्या रेषेच्याबाहेर टोलवसूली नको- एकनाथ शिंदे

ऐरोली टोलनाका मनसेनं बंद पाडला ; पिवळ्या रेषेच्याबाहेर टोलवसूली नको- एकनाथ शिंदे

मुंबईबाहेरच्या रस्त्यांवरील टोलवसुलीमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही काळ टोलवसुली बंद करण्याचे आदेश एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. एरोली टोलनाक्यावर मनसे कार्यकर्त्यांनी टोलवसुली बंद पाडलीय. त्यानंतर मंत्री एकनाथ शिंदे टोलवसुली काही काळ बंद करण्याचे आदेश दिलेत.

  • Share this:

23 डिसेंबर, ठाणे : मुंबईबाहेरच्या रस्त्यांवरील टोलवसुलीमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही काळ टोलवसुली बंद करण्याचे आदेश एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. एरोली टोलनाक्यावर मनसे कार्यकर्त्यांनी टोलवसुली बंद पाडलीय. त्यानंतर मंत्री एकनाथ शिंदे टोलवसुली काही काळ बंद करण्याचे आदेश दिलेत. पिवळ्या लाईनच्या मागे गाड्यांच्या रांगा असल्यानं गाड्यांना टोल भरावा लागू नये म्हणून मनसे कार्यकर्ते टोलनाक्यावर उभे राहून गाड्या सोडताहेत. ऐरोली टोलनाक्याजवळ टोलवसुलीमुळे वाहतूक कोंडी होत होती. ठाणे - बेलापूर मार्गावर वाहनांना चार दिवसांसाठी नो एण्ट्री असल्यामुळे सोमवारपर्यंत हा रोडब्लॉक पाहायला मिळणार आहे.

कळवा-विटावा रेल्वेब्रीज खालील खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतल्यामुळे ही स्थिती उद्भवली आहे. या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसवण्यात येणार आहेत. अशातच नाताळच्या सुट्ट्या आणि लाँग विकेंड साजरा करण्यासाठी मुंबई - ठाणेकर एकाचवेळी मोठ्या प्रमाणावर गाड्या घेऊन शहराबाहेर पडू लागल्याने जवळपास सर्वच टोलनाक्यांवरून वाहतूक कोंडी झालीय. वाहनांच्या रांगा पिवळ्या रेषेबाहेर जाऊनही टोलनाक्यांवरून वसुली सुरू होती म्हणूनच ऐरोली टोलनाक्यावरील टोलवसुली मनसे कार्यकर्त्यांनी बंद पाडलीय. टोलवसुली बंद झाल्याने वाहतूक कोंडीही कमी झाल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतुकीचा खोळंबा, खंडाळा घाटात मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक शेडुंग फाट्यावरुन वळवली.

First published: December 23, 2017, 1:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading