राज ठाकरेंच्या पत्नी करणार पूरग्रस्त भागाचा दौरा

राज ठाकरेंच्या पत्नी करणार पूरग्रस्त भागाचा दौरा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे या पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 14 ऑगस्ट : कोल्हापूर, सांगली आणि सातारा या भागात पुरानं काही दिवस थैमान घातलं. यामध्ये लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. त्यानंतर आता पूरग्रस्त भागातील लोकांना आधार देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे या भागाचा दौरा करणार आहेत.

शर्मिला राज ठाकरे या कराड, सातारा, सांगली, कोल्हापूर या पूरग्रस्त भागातील दौरा करणार आहे. यावेळी त्या पूरग्रस्तांच्या भावना जाणून घेतील. स्वत: राज ठाकरे यांनी अद्याप पूरग्रस्त भागाचा दौरा केला नसला तरी आता मनसेच्या वतीने राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे या पूरग्रस्त भागात जाणार आहेत.

कसा असेल शर्मिला ठाकरेंचा दौरा

14 ऑगस्ट - सकाळी 9.00 वाजता कराड शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी

- 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सांगलीतील पूरग्रस्त भागाची पाहणी

- सायंकाळी 6 वाजता कोल्हापुरातील शिरोळमधील पूरस्थिती जाणून घेणार

- सायंकाळी 7:30 वाजता कराडकडे रवाना, तेथील पूरग्रस्त लोकांची घेणार भेट

15 ऑगस्ट - कोल्हापूरमधील पूरग्रस्त भागाची पाहणी

कोल्हापूर, सांगलीत पुन्हा अलर्ट; 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता

गेल्या आठवड्यात कोल्हापूर, सांगली आणि सातारा या पश्चिम महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांना मुसळधार पावसामुळे महापुराचा फटका बसला होता. या तिन्ही जिल्ह्यातील नागरिकांचे प्रचंड हाल झाले होते. गेल्या 2-3 दिवसात पावसाने उघडीप घेतल्यामुळे येथील नागरिकांना काहीचा दिलासा मिळाला आहे. पण अद्यापही नदीच्या काठचे पाणी कमी झालेले नाही. अशातच हवामान विभागाने या परिसरात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे येत्या 24 ते 48 तास कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत.

जवळ जवळ एक आठवडा महापूराचा फटका बसल्याने कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील नागरिकांना पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतील कुलाबा येथील हवामान विभागाच्या प्रादेशिक कार्यालयाने 13 ऑगस्ट रोजी कोल्हापूर, सांगली या दोन जिल्ह्यांसाठी अलर्ट दिला आहे. 13 आणि 14 रोजी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. जर पुन्हा पाऊस सुरु झाला तर या दोन्ही जिल्ह्यातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.

VIDEO: 'माझ्या धन्या, मी दम सोडला पण...' मनाला चटका लावणारी कविता!

Published by: Akshay Shitole
First published: August 14, 2019, 10:13 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading