डोवलांच्या मुलाच्या कंपनीत पाकिस्तानी भागीदार चालतो का? - राज ठाकरे

डोवलांच्या मुलाच्या कंपनीत पाकिस्तानी भागीदार चालतो का? - राज ठाकरे

'डोवल यांच्या मुलाच्या कंपनीतील एक भागीदार पाकिस्तानचा आहे तर दुसरा भागीदार अरब आहे. त्यांच्या कंपनीचा भागीदार पाकिस्तानी चालतो. आपलं कोणी असतं तर त्याला देशद्रोही आणि राष्ट्रदोही ठरवलं असतं'

  • Share this:

मुंबई, 09 मार्च : शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 13 व्या वर्धापनदिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजित डोवल आणि त्यांच्या मुलावर गंभीर टीका केली आहे. 'डोवल यांच्या मुलाच्या कंपनीतील एक भागीदार पाकिस्तानचा आहे तर दुसरा भागीदार अरब आहे. त्यांच्या कंपनीचा भागीदार पाकिस्तानी चालतो. आपलं कोणी असतं तर त्याला देशद्रोही आणि राष्ट्रदोही ठरवलं असतं' असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून अजित डोवलचा लोकांना खूप पुळका आला होता. पण पुलवामा हल्ला 14 फ्रेब्रुवारीला झाला आणि 29 डिसेंबरला थायलंडमध्ये डोवाल यांची पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्याशी गुप्त बैठक झाली. यावर आता आम्ही प्रश्न विचारायचे नाहीत का' असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

काय म्हणाले राज ठाकरे

- मी गेल्या काही दिवसात पत्रकारांना भेटलोच नाही

- लोकसभा निवडणुकीसंदर्भात जो निर्णय घ्यायचा आहे तो मी नंतर घेईन

- लोकांची स्मरणशक्ती कमी असते

- रोज काही तरी घडाव आणि मागच लोकांनी विसरावं हीच मोदी सरकारची इच्छा

- लोकसभा निवडणुकीसंदर्भात लवकरच निर्णय घेणार

- मी ट्रोलला भीक घालत नाही

- पुढे आहेतच माझ्या सभा त्यावेळी बोलीलच - एका भाषणात सर्व बोलणं होणार नाही

- युद्धाची भाषा करणाऱ्यांना राज यांच्याकडून समाचार

- मोदींच्या आयटी सेलमधील बेवारस मुले ट्रोल करत असतात

- राज याच्या भाषणावेळी 'चौकीदार चोर है'च्या घोषणा

- अजित डोवल यांच्या मुलावर राज ठाकरे यांची टीका

- डोवल यांच्या मुलाच्या कंपनीतील एक भागीदार पाकिस्तानचा

- भाजपला दुसऱ्यांना राष्ट्रभक्ती शिकवण्याचा काय अधिकार?, राज यांचा सवाल

VIDEO : प्ले ग्रुपमध्ये शिक्षिकेची चिमुकल्याला बेदम मारहाण

First published: March 9, 2019, 7:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading