BREAKING : राज ठाकरे यांचा दिल्ली दौरा अचानक रद्द, राहुल गांधींची घेणार होते भेट

BREAKING : राज ठाकरे यांचा दिल्ली दौरा अचानक रद्द, राहुल गांधींची घेणार होते भेट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दिल्ली दौरा रद्द झाला आहे. एका कार्यक्रमामुळे त्यांनी हा दौरा रद्द केला असल्याचं सांगण्यात येत आहे.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, प्रतिनिधी

मुंबई, 06 जानेवारी:  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दिल्ली दौरा रद्द झाला आहे. एका कार्यक्रमामुळे त्यांनी हा दौरा रद्द केला असल्याचं सांगण्यात येत आहे. देशातील प्रमुख नेत्यांना अमित ठाकरेच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी ते दिल्ली दौरा करणार होते. पण तो काही कारणास्तव रद्द करण्यात आला आहे.

दरम्यान, राज ठाकरे हे दिल्लीला राहुल गांधी यांना अमित ठाकरेच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी जाणार होते. ते रविवार आणि सोमवार हे दिल्लीतच राहणार होते. पण मुंबईत एका कार्यक्रमात व्यस्त असल्यामुले त्यांनी त्यांचा दिल्ली दौरा रद्द केला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

तर एकीकडे राज ठाकरे हे नरेंद्र मोदी यांना पत्रिका न देता थेट राहुल गांधी यांना भेटणार होते अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. पण सध्यातरी राज यांनी त्यांचा दिल्ली दौरा रद्द केला आहे.

राज ठाकरे-शरद पवारांमध्ये तब्बल 2 तास चर्चा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 2 तास चर्चा झाली आहे. ही भेट राजकीयच असल्याची सूत्रांची माहिती आहे.

ईशान्य मुंबई या लोकसभा जागेसाठी राज ठाकरे आग्रही असल्याची माहिती आहे. राज ठाकरेंच्या मनसेला महाआघाडीत सामावून घेतलं जाऊ शकतं. त्यामुळे राष्ट्रवादीकडून त्यांच्या वाट्याच्या जागा मनसेला दिल्या जाऊ शकतात.

दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने लोकसभेची जय्यत तयारी सुरू केल्याचं पाहायला मिळतंय. दोन्ही पक्षांकडून आघाडीसाठीची बोलणी अंतिम टप्पात आहेत.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांनी 50-50 च्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी लोकसभेच्या प्रत्येकी 24 जागा लढवणार हे आता नक्की झालं आहे.

VIDEO: 'राज ठाकरे स्वत: शिवसेना सोडून गेले आहेत... हवं तेव्हा त्यांनी परत यावं'

First published: January 6, 2019, 2:10 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading