डोंबिवलीत रिक्षा चालकांविरोधात मनसे आक्रमक, कारवाईने सगळ्यांचीच बोबडी वळली

डोंबिवलीत रिक्षा चालकांविरोधात मनसे आक्रमक, कारवाईने सगळ्यांचीच बोबडी वळली

अशा रिक्षा चालकांनी उद्या जर गुन्हा केला तर त्यांना शोधणार कुठे ?

  • Share this:

मुंबई, 03 फेब्रुवारी : मुंबईमध्ये मराठी प्रवाशाला मारहाण करणाऱ्या एका रिक्षाचालकाला मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या भाषेत समजावलं होतं. आजही मनसे कार्यकर्त्यांनी डोंबिवलीमधल्या एका अनधिकृत रिक्षा स्टँडवर धडक दिली आणि चालकांची कागदपत्र तपासली.

यावेळी एका रिक्षाचालकाकडे लायसन, बॅच, कागदपत्र यापैकी काहीच सापडलं नाही. त्यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात देऊन अशा रिक्षा चालकांनी उद्या जर गुन्हा केला तर त्यांना शोधणार कुठे ? असा सवालही उपस्थित केला.

मुंबईत प्रवाशाला मारहाण करणाऱ्या रिक्षाचालकाला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच आता डोंबिवलीतही मनसे रिक्षाचालकांविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं.

डोंबिवलीत आज मनसेनं अनधिकृत रिक्षा स्टॅण्डवर धडक दिली. डोंबिवली पूर्वेला रेल्वे स्टेशनच्या बाहेरच हे अनधिकृत रिक्षास्टॅण्ड उभारण्यात आलं. या स्टँडवर जाऊन मनसेनं रिक्षाचालकांचे बॅच, परवाने, कागदपत्रं तपासली. यावेळी एका रिक्षाचालकाकडे लायसन्स, बॅच, रिक्षाची कागदपत्रं यापैकी काहीही आढळून आलं नाही.

त्यामुळं मनसे शहराध्यक्ष राजेश कदम आणि अन्य कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण करत पोलीस ठाण्यात आणलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. अशा अनधिकृत रिक्षाचालकांनी उद्या एखादा गुन्हा केला, तर त्यांना कुठे शोधणार? असा सवाल करत यापुढे असे अवैध धंदे डोंबिवलीत चालू देणार नसल्याचा इशारा मनसेच्या वतीनं देण्यात आला.

VIDEO : शाळेतच बार गर्ल्सने केला अश्लील डान्स, विद्यार्थ्यांकडून पैशांची उधळण

First published: February 3, 2019, 11:14 AM IST

ताज्या बातम्या