मुंबई, 25 जानेवारी : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. कला क्षेत्रातून अदनाम सामीला पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे. अदनान सामीला पुरस्कार जाहीर झाल्यामुळे मनसेनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्वीट करून मोदी सरकारच्या या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.सुरेश वाडकर यांना पद्मश्री मिळाल्याचा आनंद साजरा करतोय, तोच आनंदावर थोडं विरजण पडलं अदनान सामीला दिलेल्या पद्मश्रीमुळे. २०१५ मध्ये म्हणजे मोदींच्याच काळात त्याला भारतीय नागरिकत्व मिळालं आणि लगेच चार वर्षात त्याला पद्मश्रीही बहाल केला. त्याला एवढं लिफ्ट करण्याचं कारण काय? असा सवाल खोपकर यांनी उपस्थितीत केला आहे.
मूळ भारतीय नागरिक नसलेल्या अदनान सामीला भारत सरकारने कोणताही पुरस्कार देऊ नये,हे मनसे च ठाम मत आहे. त्यामुळे त्याला बहाल केलेल्या पद्मश्री पुरस्काराचा मनसेकडून तीव्र शब्दात निषेध. अदनान सामीला जाहीर झालेला पद्म पुरस्कार त्वरित रद्द करण्यात यावा ही मनसेची मागणी आहे.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) January 25, 2020
तसंच, मूळ भारतीय नागरिक नसलेल्या अदनान सामीला भारत सरकारने कोणताही पुरस्कार देऊ नये. हे मनसेचं ठाम मत आहे. त्यामुळे त्याला बहाल केलेल्या पद्मश्री पुरस्काराचा मनसेकडून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. अदनान सामीला जाहीर झालेला पद्म पुरस्कार त्वरित रद्द करण्यात यावा, अशी मागणीही खोपकर यांनी केली आहे.
सुरेश वाडकर यांना पद्मश्री मिळाल्याचा आनंद साजरा करतोय, तोच आनंदावर थोडं विरजण पडलं अदनान सामीला दिलेल्या पद्मश्रीमुळे. २०१५ मध्ये म्हणजे मोदींच्याच काळात त्याला भारतीय नागरिकत्व मिळालं आणि लगेच चार वर्षात त्याला पद्मश्रीही बहाल केला. त्याला एवढं लिफ्ट करण्याचं कारण काय?
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) January 25, 2020
तर दुसरीकडे, अदनान सामी याने पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. आपल्या सरकारने सन्मान केल्याचा क्षण हा अभिमानाचा आहे. असं म्हणत, मोदी सरकारचे अदनानने आभार व्यक्त केले आहे.
दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशभरात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या दिग्गजांचा पद्म पुरस्कारने सन्मान करण्यात आला आहे. कला क्षेत्रातून कंगना राणावतला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या आधी कंगनाने तीन राष्ट्रीय पुरस्कार पटकावले होते.
The greatest moment for any Artiste is to be appreciated & recognised by his/her government. I am overwhelmed with infinite gratitude for being honoured with the ‘Padma Shri’ by the Government of India. It has been a 34 years musical journey.. ‘Bohot Shukriya’!!🙏#PadmaAwards
— Adnan Sami (@AdnanSamiLive) January 25, 2020
कंगना रानावत सोबत चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर, बालाजी टेलिफिल्मच्या निमित्या आणि ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांची कन्या एकता कपूर हिलाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. अदनान सामी यांनाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
सुरेश वाडकर यांना पद्मश्री
गेली अनेक वर्ष ज्यांनी रसिकांच्या मनावर सुरांनी अधिराज्य गाजवलं अशा ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना यंदाचा देशातील अत्यंत पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. सुरेश वाडकरांनी आजपर्यंत हिंदी-मराठी- भोजपुरी- कोकणी- ओडिया अशा अनेक भाषांमधील गाणी गायली आणि ती लोकप्रियही झाली. 'मेघा रे मेघा रे', 'चप्पा चप्पा चरखा चले', 'ए जिंदगी' यांसारख्या अनेक सुपरहिट गाण्यांमुळे सुरेश वाडकरांनी चाहत्यांच्या मनावर त्यांच्या आवाजाची छाप सोडलीये.सुरेश वाडकर यांनी संगीताचं प्रशिक्षण देण्यासाठी आजीवासन म्युझिक अकॅडमीची स्थापना केली.
राहीबाई पोपेरे आणि पोपटराव पवार यांना पद्मश्री
दरम्यान, 'बीजमाता' म्हणून प्रसिद्ध असलेल्या राहीबाई पोपेरे आणि अहमदनगरच्या आदर्श गाव हिवरेबाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राहीबाई पोपेरे यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय. निरक्षर असूनही राहीबाईंनी अहमदनगरमधील आदिवासी भागात कृषीक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलीय. जैविक बियाणांची बँक चालवत असल्यामुळे त्या 'बीजमाता' म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी आतापर्यंत शंभरहून अधिक देशी बियाणांचं जतन केलंय. तर जलसंधारण क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल हिवरेबाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
यंदाचे पद्मश्री पुरस्कार
राहीबाई पोपेरे - कृषी क्षेत्र
पोपटराव पवार - जलसंधारण क्षेत्रा
जगदीप लाला आहुजा - सामाजिक कार्य
मोहम्मह शरीफ - सामाजिक कार्य
जावेद अहमद टाक - दिव्यांगासाठी कार्य
तुलसी गौडा - पर्यावरण
सत्यनारायण मुंदायूर - शिक्षण क्षेत्रातील कार्य
अब्दुल जब्बार - सामाजिक कार्य
उषा चौमूर - सामाजिक कार्य
हरेकला हजब्बा - शिक्षण क्षेत्रातील कार्य
अरुणोदय मंडल - आरोग्य क्षेत्र
राधामोहन आणि साबरमती - कृषी क्षेत्रातील कार्य
कुशल कोनवार सरमा - प्राण्यांसाठी कार्य
त्रिनीटी साईओ - कृषी क्षेत्रातील कार्य
रवी कन्नन - आरोग्य
एस रामकृष्णन - दिव्यांगांसाठी कार्य
सुंदरम वर्मा - पर्यावरण
मुन्ना मास्टर - कला
योगी अॅरोन - आरोग्य क्षेत्रातील कार्य
हिंमत राम भांभू - पर्यावरण कार्य
मुजीक्कल पंकजाक्षी - कला क्षेत्र
कंगना राणावत-अभिनेत्री
सुरेश वाडकर-गायक
अदनान सामी-गायक
करण जोहर-दिग्दर्शक
एकता कपूर-दिग्दर्शन
झहीर खान-क्रिकेट
जीतू राय-नेमबाज
पद्मविभूषण पुरस्काराचे मानकरी
- अरूण जेटली (मरणोत्तर)
- सुषमा स्वराज (मरणोत्तर)
- जॉर्ज फर्नांडीस (मरणोत्तर)
- स्वामी विश्वेश तीर्थ (मरणोत्तर)
- मेरी कॉम (क्रीडा)
- छन्नुलाल मिश्रा
- अनेरूद जुगुनाथ जीसीएसके
पद्म भूषषचे मानकरी
- मनोहर पर्रिकर (मरणोत्तर)
- मुमताज अली (आध्यात्मिक क्षेत्र)
- सय्यद मुझीम अली (मरणोत्तर)
- आनंद महिंद्रा
- अजोय चक्रवर्ती (कला)
- मनोज दास
- बालकृष्ण दोशी
- क्रिष्णम्मल जगन्नाथन
- एस. सी. जमीर
- अनिल प्रकाश जोशी
- डॉ. त्सेरिंग लंडोल
- निळकांता रामकृष्णा माधवा मेनन (मरणोत्तर)
- जगदीश शेठ
- पी.व्ही सिंधू
- वेणू श्रीनिवासन
- मुझफ्फर हुसेन बेग
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kangana ranaut, Karan Johar, MNS, Raj Thackery