तसंच, 'राज्यात कोरोना व्हायरसचे थैमान सुरू आहे. दिवा विभागातही एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे त्यामुळे नागरिकांमध्ये आधीच भीतीने वातावरण आहे. त्यातच राज्यात लॉडाऊन असल्याने सर्वजण घरी आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवा असलेला वीज पुरवठा सुरळीत असावा अशी सर्वांची अपेक्षा होती. परंतु, टोरंट कंपनीचा भोंगळ कारभार सुरू असून वीज पुरवठ्यामध्ये बिघाड होऊन 12-12 तास होऊनही टोरंट कंपनीच्या कर्मचाऱ्यांना तांत्रिक बिघाड सापडत नाही हे दुर्दैवी आहे. हेही वाचा - 'संतांची नाही, नराधमांची भूमी जास्त योग्य', पालघर प्रकरणावर सुमित राघवन संतापला वास्तविक दिव्यातील नागरिकांचा टोरंट कंपनीला कडाडून विरोध होता. त्यासाठी अनेक विधायक मार्गानी टोरंट दिवा-शीळ विभागात आणू नये म्हणून सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. तरीही शासनाने जबरदस्तीने ही कंपनी लादली आहे आणि त्याचे परिणाम आज सर्वसामान्य नागरिकांना भोगावे लागत आहेत. टोरंट पेक्षा महावितरणचा कारभार चांगला होता अशी भावना आज जनतेमध्ये आहे. त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे. आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारंवार वीज खंडीत होत असल्याने त्रस्त जनतेने रस्त्यावर उतरून आंदोलन केल्यास लॉतडाऊनचा काहीही उपयोग होणार नाही. सतत होणाऱ्या विजेच्या खेळ खंडोबा मुळे रहिवासी रस्त्यावर उतरल्यास लॉकडाऊनला कोणताही अर्थ उरणार नाही व याची सर्वस्वी जबाबदारी ऊर्जा विभाग व टोरंट कंपनी प्रशासनावर राहील याची दखल घ्यावी, ' असा इशाराही त्यांनी दिला. हेही वाचा -कोरोना पॉझिटिव्ह डॉक्टरच्या संपर्कात आल्यानंतर गरोदर महिलेनी दाखवली जागरुकता त्याचबरोबर, दिवा -शीळ विभागातील टोरंट कंपनीच्या हातातील कारभार ताबडतोब काढून पुन्हा महावितरणकडे देण्यात यावा, अशी विनंतीही पाटील यांनी केली. संपादन - सचिन साळवेकाही दिवसांपासून दिवा विभागातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. 12-12 तास होऊनही टोरंट कंपनीच्या कर्मचाऱ्यांना तांत्रिक बिघाड सापडत नाही. येथे एक #corona+ रुग्ण सापडला आहे त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. रहिवासी रस्त्यावर उतरल्यास शटडाऊनला कोणताही अर्थ उरणार नाही. @NitinRaut_INC pic.twitter.com/GduVRVINWX
— Raju Patil (@rajupatilmanase) April 19, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.