अजितदादांच्या 'त्या' निर्णयाचं मनसे आमदाराकडून कौतुक, कल्याण-डोंबिवलीसाठी केली मागणी

अजितदादांच्या 'त्या' निर्णयाचं मनसे आमदाराकडून कौतुक, कल्याण-डोंबिवलीसाठी केली मागणी

मूळ जबाबदारी सांभाळून पुणे महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी प्रयत्न करणार आहेत. खरोखरच अत्यंत चांगला प्रयोग आहे.

  • Share this:

डोंबिवली, 28 एप्रिल : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असून जवळपास 137 पर्यंत पोहचली आहे. अनेक हॉटस्पॉट तयार होत आहेत. आतापर्यंत विविध उपाययोजना करूनही रुग्णसंख्या आटोक्यात येताना दिसत नसल्यामुळे महापालिका क्षेत्रात कोरोनामुक्त करण्यासाठी पुणे पॅटर्न राबविण्यात यावा, अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यसचिव, महाराष्ट्र राज्य मंत्रालय यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी पत्र सुद्धा दिले आहे.

मनसे आमदार पाटील यांनी सांगितले की, 'कोरोना रुग्ण संख्येमध्ये डोंबिवली राज्यात 4 नंबरवर आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. देशासह राज्यातील लॉकडाऊन दोन वेळा वाढवण्यात आला आहे. परंतु, त्यालाही मर्यादा आहेत. कल्याण डोंबिवलीमध्ये आरोग्य सेवांची आधीच दयनीय परिस्थिती असताना अचानक आलेल्या या संकटामुळे प्रशासनास कोरोनाला आळा घालण्यासाठी पाहिजे, तसे यश येताना दिसत नाही. त्यामुळे लॉककडाऊन असूनही रुग्ण संख्या कमी होत नसल्याने सध्या जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांसह नागरिकही हतबल झालेले दिसत आहेत. यावर लवकरात लवकर निर्णायक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.'

हेही वाचा - ...नाहीतर अनेक राज्य कोसळतील, सेनेनं करून दिली मोदींना राजकीय 'गुरू'ची आठवण

पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्येही कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत असताना त्याला आळा घालण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सध्या कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या दिमतीला नवीन 4 अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.  हे अधिकारी त्यांच्या जवळ असलेली मूळ जबाबदारी सांभाळून पुणे महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी प्रयत्न करणार आहेत. खरोखरच अत्यंत चांगला प्रयोग आहे. त्यामुळे राज्यातील इतर ज्या भागांमध्ये कोरोनाबाधित संख्या वाढत आहे. त्या ठिकाणी राबविण्यास हरकत नाही, असं म्हणत राजू पाटील यांनी अजित पवार यांच्या पुणे पॅटर्नचं कौतुक केलं.

हेही वाचा - पुण्यात आणखी 5 पोलिसांना कोरोनाची लागण, आयुक्तांनी घेतला मोठा निर्णय

पुणे पालिका क्षेत्र कोरोनामुक्त करण्यासाठी राबविण्यात येत असलेला प्रयोग कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्येही राबविण्यात यावा आणि आता कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या दिमतीला अजून काही अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. तसंच आवश्यकतेनुसार राज्यातील इतर भागातही राबविण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

संपादन - सचिन साळवे

First published: April 28, 2020, 11:27 AM IST

ताज्या बातम्या