लोकसभेसाठी कृष्णकुंजवर ठरणार मनसेचा मास्टर प्लान, बैठक सुरू

मनसेनं आयोजित केलेल्या या बैठकीमध्ये बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, अविनाश अभ्यंकर असं अनेक नेते उपस्थित आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jan 31, 2019 12:59 PM IST

लोकसभेसाठी कृष्णकुंजवर ठरणार मनसेचा मास्टर प्लान, बैठक सुरू

मुंबई, 31 जानेवारी : 2019च्या लोकसभा निवडणुका जवळ आल्यामुळे सध्या सगळ्यांच राजकीय पक्षांमध्ये बैठकांचं सत्र सुरू झालं आहे. मनसेचीही कृष्णकुंजवर बैठक सुरू झाली आहे. राजकीय चर्चेसाठी ही बैठक घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

मनसेनं आयोजित केलेल्या या बैठकीमध्ये बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, अविनाश अभ्यंकर असं अनेक नेते उपस्थित आहेत. निवडणुका जवळ आल्या पण तरीदेखील सेना-भाजप युतीबाबत अजूनही संभ्रम आहे. त्यात मनसे आणि राष्ट्रवादीच्या युतीची खूप चर्चा रंगली.

आम्हाला पक्षश्रेष्ठींकडून आदेश आले तर आम्ही राष्ट्रवादीसोबत जाण्यासाठी तयार आहोत अशी भूमिका मनसे नेत्यांकडून मांडण्यात आली होती. पण त्यावर मनसेसोबत युतीबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

मनसे आणि आमची विचारधारा निराळी असल्याने आम्ही मनसेबरोबर कुठल्याही प्रकारची युती करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलं. आम्हा 2 पक्षात आघाडी होणार असल्याची चर्चा ही वावडय़ा असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

या वेळी पाटील पत्रकारांशी बोलत होते. मनसे आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांच्या संभाव्य युतीबाबत सुरू असलेल्या चर्चेबाबत विचारले असता त्यांनी वरील स्पष्टीकरण दिलं.

Loading...

त्यामुळे आता लोकसभा निवडणुकांसाठी राजकीय़ हालचाली करण्य़ासाठी मनसेने ही बैठक घेतली आहे. त्यात काय निर्णय होतो हेच पाहणं आता महत्त्वाचं आहे.


SPECIAL REPORT : 'कल्याण-पुणे-नाशिक' अशी असेल लोकल सेवा


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 31, 2019 12:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...