सुशांत माळवदे यांच्या मारहाणीचा व्हिडिओ आला समोर

सुशांत माळवदे यांच्या मारहाणीचा व्हिडिओ आला समोर

गेल्या आठवड्यात मालाडमध्ये मनसेचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांना फेरीवाल्यांकडून झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ आता समोर आलाय. सुशांत माळवदे हे मालाड स्टेशनबाहेरील फेरीवाल्यांना हटवण्यासाठी गेले होते त्यावेळी फेरीवाल्यांनी लाठ्या काठ्यांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. त्यात ते गंभीर जखमी झाले होते.

  • Share this:

मुंबई, 03 नोव्हेंबर : गेल्या आठवड्यात मालाडमध्ये मनसेचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांना फेरीवाल्यांकडून झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ आता समोर आलाय. सुशांत माळवदे हे मालाड स्टेशनबाहेरील फेरीवाल्यांना हटवण्यासाठी गेले होते त्यावेळी फेरीवाल्यांनी लाठ्या काठ्यांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतरच मनसे आणि फेरीवाले आणि मनसे पुन्हा आमनेसामने आलेत.

संजय निरुपम यांच्या चिथावणीवरून माळवदे यांना फेरीवाल्यांनी मारहाण केल्याचा मनसेचा आहे. या मनसे विरूद्ध फेरीवाले वादातूनच गेले आठवडाभर मुंबईतलं वातावरण ढवळून निघालं होतं. आता व्हिडिओ पाहून पोलीस नेमकी काय कारवाई करतात हे पाहावं लागणार आहे.

First published: November 3, 2017, 10:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading